Download App

रिलायन्स जिओच्या रिचार्जला ‘BSNL’ची टक्कर; १६० दिवसांच्या प्लानमध्ये पैशांचीही होईल बचत

रिलायन्स जिओने आपले दर महाग केले आहेत. टेलिकॉम कंपनीने आपल्या 45 कोटींहून अधिक मोबाईल फोन वापरकर्त्यांना याचा फटका बसला आहे.

  • Written By: Last Updated:

Mobile Recharge Plan : रिलायन्स जिओने आपले रिचार्जचे दर महाग केलं आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या टेलिकॉम कंपनीने आपल्या 45 कोटींहून अधिक मोबाईल फोन वापरकर्त्यांना महागाईचा मोठा धक्का दिला आहे. (Mobile Recharge) प्लानमध्ये जवळपास 22 टक्के वाढ करण्यात आली आहे. (Jio) यामुळे बहुतेक लोक बीएसएनएलकडे वळत आहेत.

दुसरीकडे सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या (BSNL)ने कोणत्याही प्लानच्या दरात वाढ केलेली नाही, ज्यामुळे (BSNL)प्लॅन अजूनही लोकांना कमी किमतीत उत्तम फायदे आणि वैधता देत आहेत. दरम्यान, (BSNL997) प्लॅन आणि (Jio 999) प्लॅनची ​​तुलना केली तर किती होते? त्याच्या वैधतेच्या बाबतीत किमतीबाबत कोणता रिचार्ज प्लॅन फायदेशीर ठरतो हे मुद्दे आहेत.

BSNL 997 रिचार्ज प्लॅन मी सांगितलं तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता; विधान परिषद निवडणुकीवर पवारांचा खुलासा

997 रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 GB हायस्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ दिला जाणार आहे. 160 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना काही ॲप्सचा विनामूल्य प्रवेश देखील दिला जाईल. वापरकर्त्यांना एकूण 320 GB हायस्पीड डेटा मिळेल.

Jio 999 रिचार्ज प्लॅन

999 रुपयांच्या Jio प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB हायस्पीड डेटा, दररोज 100 SMS आणि मोफत अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. 98 दिवसांची वैधता असलेला हा प्लान वापरकर्त्यांना एकूण 196 GB हाय स्पीड डेटा मिळतो. तसंच, या प्लॅनमध्ये जीओच्या तीन ॲप्सचा समावेश आहे.

 जिओच्या तुलनेत कमी ‘लाडका भाऊ योजनेसाठी या पद्धतीने करा अर्ज; एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

दोन्ही प्लॅनच्या किमतीमध्ये केवळ 2 रुपयांचा फरक आहे. मात्र, तुम्हाला दोन्ही प्लॅनच्या वैधतेमध्ये लक्षणीय फरक दिसेल, जिओ प्लॅन केवळ 98 दिवसांच्या वैधतेसह येतो, तर बीएसएनएल प्लॅनची ​​वैधता १६० दिवसांची मिळते. डेटामधील फरकाबद्दल सांगायचं झाल्यास, BSNL कंपनीच्या प्लानमध्ये Jio पेक्षा 124 GB जास्त डेटा मिळतो. एकूणच, बीएसएनएल प्लानची किंमत जिओच्या तुलनेत कमी आहे. परंतु, डेटा आणि वैधतेच्या बाबतीत, बीएसएनएलने आपल्या ग्राहकांची मने जिंकली आहेत.

follow us