Sugar Export Ban : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत सप्टेंबर 2026 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. याबाबत एक अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. कच्ची, पांढरी आणि शुद्ध (Refined) साखर यांच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने सप्टेंबर 2026 पर्यंत बंदी घालण्यात येत असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन (EU) आणि अमेरिकेला होणारी साखर निर्यात, अड्वान्स प्राधिकरण योजना (AAS), आणि इतर देशांच्या अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार-ते-सरकार होणाऱ्या निर्यातीला लागू होणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या मालाच्या खेपांनाही यातून सूट देण्यात आली आहे.
The Central Government bans the export of sugar with immediate effect till September 30, 2026, or until further orders. Directorate General of Foreign Trade (DGFT) issues a notification amending the export policy from ‘Restricted’ to ‘Prohibited’.
The prohibition will not apply… pic.twitter.com/TwafGBuXRl
— ANI (@ANI) May 14, 2026
आज ‘या’ 3 राशींचे भाग्य उजळणार; होणार मोठा फायदा
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या किमतींमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. तसेच देशाच्या काही भागांमध्ये उसाच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता कायम असल्याने जर साखरेची निर्यात विनाअडथळा सुरू राहिली, तर सणासुदीच्या काळात आणि आगामी महिन्यांमध्ये देशांतर्गत साखरेच्या किमती प्रचंड वाढू शकतात. यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत सप्टेंबर 2026 पर्यंत साखरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
पुण्यात खळबळ! हॉस्पिटलमध्ये आढळली बॉम्ब सद्दश्य वस्तू; तपास सुरु-
