Ushakiran Hospital : पुण्यात खळबळ! हॉस्पिटलमध्ये आढळली बॉम्ब सद्दश्य वस्तू; तपास सुरु
Ushakiran Hospital : पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या उषाकिरण हॉस्पिटलच्या बाथरुममध्ये टायमर बॉम्बद्दश्य वस्तू आढळून आली. बुधवारी
Ushakiran Hospital : पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या उषाकिरण हॉस्पिटलच्या बाथरुममध्ये टायमर बॉम्बद्दश्य वस्तू आढळून आली. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी पोहचत संशयास्पद वस्तू सुरक्षिरीत्या ताब्यात घेत मोकळ्या मैदानात नष्ट केली.
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ७ च्या आसपास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या बाथरुममधील बेसिनखाली ही संशायास्पद वस्तू ठेवली होती. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये एक व्यक्ती बाथरुममध्ये ही वस्तू ठेवताना दिसत असल्याची देखील माहिती समोर येत आहे. बाथरुममध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यांना ही वस्तू आढळून आल्यानंतर त्यांनी या बाबतची माहिती डॉक्टर विलास गायकवाड यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या वस्तूला चार जिलेटिन कांड्या, घड्याळाच्या स्वरुपातील टायमर आणि वायर जोडलेली होती.
तसेच टायमवर 7.21 अशी वेळ दिसत असल्याने डॉक्टर गायकवाड यांनी ती वस्तू उचलून हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत हलवली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. तर दुसरीकडे आता या प्रकरणातील संशयित व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांकडून परिसरात असणाऱ्या सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा काम सुरु आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर खासगी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सुरक्षा यंत्रणेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत असून परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) म्हणाले की, रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की, रुग्णालयाच्या आवारात बॉम्बसारखे दिसणारे एक डिव्हाइस आढळून आले आहे. पोलीस पथक, तसेच बॉम्ब निकामी करणारे पथक (Bomb Disposal Squad), तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने, विहित नियमावलीचे (प्रोटोकॉल्सचे) काटेकोरपणे पालन करून, डिव्हाइस ताब्यात घेतले आणि ग्लायडिंग सेंटर येथील एका मोकळ्या मैदानावर नेले.
#WATCH | Pune PC Amitesh Kumar says, “Around 8 p.m. today, we got some information that there was a bomb like device found on the hospital premises. The police team, along with the bomb disposal squad, immediately reached the spot. The bomb disposal squad carried this device… https://t.co/fbzuOD8ySF pic.twitter.com/NEAZKfpMG6
— ANI (@ANI) May 13, 2026
तो बॉम्ब यशस्वीरित्या निकामी करण्यात आला. बॉम्ब शोधक आणि निकामी करणाऱ्या पथकाने (BDDS) अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्व संबंधित पथकांना कामावर जुंपण्यात आले आहे. पुणे शहर पोलीस, स्थानिक पोलीस ठाणे, तसेच गुन्हे शाखा (Crime Branch) आणि एटीएस (ATS) पथके संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही या प्रकरणाचा सर्व संभाव्य अंगांनी तपास करत आहोत. तपासात एटीएसचाही सहभाग आहे असं अमितेश कुमार म्हणाले.
आज ‘या’ 3 राशींचे भाग्य उजळणार; होणार मोठा फायदा