Download App

शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ! मोहम्मद फैजल यांची खासदारकी कायम

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाबाबत अजित पवार व शरद पवार गटामध्ये संघर्ष सुरू आहे. भारत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. लक्षद्वीपचे खासदार (MP) मोहम्मद फैजल (mohammed faizal) यांची खासदारकी निलंबित करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी स्थगिती दिली. खुनाच्या खटल्यात केरळ उच्च न्यायालयाने खासदार फैजल यांना दोषी ठरविले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद फैजल यांना खुनाच्या खटल्यात शिक्षा सुनाविण्यात आली होती. ही शिक्षा निलंबित करण्यासाठी फैजल यांनी केरळ उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. हे अपिलही उच्च न्यायालयाने फेटाळून लावले होते. याविरोधात फैजल हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. दोषी आढळल्याने दोन वेळेस फैजल यांची खासदारकी निलंबित करण्यात आली होती. 3 ऑक्टोबर रोजी केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांना लोकसभेतून निलंबित करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात फैजल हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

Tags

follow us