Monsoon arrived in Andaman 3 days earlier : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) कहर केला होता. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, आता अवकाळी पाऊस संपल्यानंतर काही भागात तापमानाचा पारा (temperature) झपाट्याने वाढला आहे. यामुळे आता सर्वांनाच मान्सूनच्या पावसाची (Monsoon rains) प्रतीक्षा आहे. यंदा मान्सून उशिरा येण्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला होता. दरवर्षी 22 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून अंदमानच्या काही भागात तीन दिवस आधीच दाखल झाला आहे.
हवामान खात्याच्या माहीतीनुसार, नैऋत्य मान्सून काल (19 मे) रोजी आग्नेय बंगालचा उपसागर, निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्रात पोहोचला. येत्या 3-4 दिवसांत दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागराच्या आणखी काही भागात, अंदमान समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात नैऋत्य मान्सून पुढे जाण्यास अनुकूल परिस्थिती आहे, अशी माहीती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
कृषीप्रधान देशात मान्सूनच्या आगमनाने चार महिन्यांचा पावसाळा सुरू झाला आहे. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी राजासोबतच सर्वसामान्य माणूसही सुखावून जातो. मात्र, यंदा तोच मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की केरळमध्ये मान्सूनची सुरुवात 1 जूनच्या सामान्य तारखेपेक्षा थोडी उशिरा होऊ शकते. मात्र मान्सूनच्या हालचालीमुळं यात बदल होण्याची शक्यता आहे.
Centre Ordinance: दिल्ली सरकारवर केंद्राची कुरघोडी, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आणला अध्यादेश
नैऋत्य मान्सूनचे आज दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आज, १९ मे रोजी आगमन झाले.
पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून,दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात,अंदमान समुद्र,अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे
IMD pic.twitter.com/eaiQWAmYmC— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 19, 2023
मान्सून काही दिवसांत सक्रिय होण्याची शक्यता.
IMD नुसार, नैऋत्य मान्सून पुढील 3-4 दिवसांत आणखी भागात पुढे सरकरण्याची अपेक्षा आहे. भारताच्या $3.5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच चांगला मान्सून आल्याने सिंचनापासून ते पाणीसाठ्यापर्यंतच्या समस्या दूर होतील, अशी आशा हवामान खात्याला आहे.
1 जूनपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल
काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र पावसाची स्थिती अशीच राहिली तर साधारणपणे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज आहे. खरं तर, मान्सून 29 मे 2021 मध्ये 3 जून, 2020 मध्ये 1 जून, 2019 मध्ये 8 जून आणि 2018 मध्ये 29 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. त्यामुळं यंदा यंदा मान्सून कधी येणार हे पाहावे लागेल.