Download App

मोठी बातमी! केरळमध्ये मान्सून दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा

Monsoon Arrived in Kerala : केरळमध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Monsoon Arrived in Kerala : केरळमध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (India Meteorological Department) देण्यात आली आहे. यंदा मान्सून आठवड्याआधीच केरळमध्ये (Kerala) दाखल झाल्याने महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मान्सून आता एका आठवड्याआधीच दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी केरळमध्ये मान्सूनचे आगमन गेल्या 16 वर्षांमध्ये सर्वात लवकर झाला आहे. तर दुसरीकडे कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सून प्रणालीच्या प्रगतीमुळे गेल्या दोन दिवसांत केरळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. याआधी केरळमध्ये 2001 आणि 2009 मध्ये मान्सून लवकर दाखल झाला होता. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 1 जून असते, गेल्या 25 वर्षांत मान्सूनचे सर्वात उशिरा आगमन 2016 मध्ये झाले होते, जेव्हा मान्सून 09 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

हवामान विभागाने आज मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिले आहे. या भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी क्षेत्राच्या तीव्रतेमुळे राज्यात पूर्वमाोसमी वारे वाहत असल्याने राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार ते अतिमुसधार पाऊस होत आहे.

अफवांकडे दुर्लक्ष करा अन्…, ‘कांतारा: चॅप्टर 1’ बद्दल निर्मात्यांनी चाहत्यांना केले खास आवाहन

तर दुसरीकडे आज पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नांदेड, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात आज वादळी पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांसाठी देखील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.

follow us