Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज समोर आले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजपने बाजी मारली, तर तेलंगणात काँग्रेसला सत्ता मिळाली. मात्र, आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) उमेदवारांचे या निवडणूकीत डिपॉजिट जप्त झाले.
Assembly Election 2023: भाजपने सेमीफायनल जिंकली ! मोदींचा ‘मिशन 2024’चा रोडमॅप क्लिअर कसा झाला ?
यंदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेल्या आम आदमी पक्षाने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत अनेक रॅली आणि रोड शो केले होते. असे असतानाही या निवडणुकीत ‘आप’ला पराभवाला सामोरे जावे लागले.
‘आप’ला निवडणुकीत विशेष छाप सोडता आली नाही
निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकली तर आम आदमी पार्टीला निवडणुकीत कोणतीही विशेष छाप सोडता आलेली नाही. गुजरात विधानसभा निवडणुकीतील चमकदार कामगिरीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये पक्षाचा पक्ष विस्तारासाठी काम करत होते. परंतु यावेळी आपच्या आशा धुळीस मिळाल्या.
राजस्थान-मध्यप्रदेशच्या निवडणुका महत्वाच्या
आम आदमी पक्षाला एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. मात्र, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांतील निवडणुका आम आदमी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण या निवडणुकांचे निकाल आपच्या राष्ट्रीय विस्ताराची गती ठरवतील. सीएम केजरीवाल यांच्यासह अनेक आपचे नेते अबकारी घोटाळ्यात सीबीआय चौकशीला सामोरे जात आहेत, त्यामुळे या तीन राज्यांचे निकाल आम आदमी पक्षाला नवी ताकद देऊ शकत होते. मात्र, आपला पराभव स्विकारावा लागला.
नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार
सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले
आपल्या विस्तारवादी धोरणाचा भाग म्हणून, आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशातील 230 विधानसभा जागांपैकी 70 पेक्षा जास्त उमेदवार, राजस्थानमधील 199 विधानसभा जागांपैकी 88 उमेदवार आणि छत्तीसगडमधील 90 विधानसभा जागांपैकी 57 उमेदवार उभे केले होते. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे या राज्यांमध्येही केजरीवाल यांनी मोफत वीज, पाणी आणि शिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. अनेक रॅली आणि रोड शो करूनही ‘आप’ला काहीच फायदा झाला नाही. केजरीवाल यांना तिन्ही राज्यांतून मोठा धक्का बसला आहे.
महापौर राणी अग्रवालही निवडणुकीत पराभूत
‘आप’ने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 200 हून अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. बहुतांश जागांवर ‘आप’च्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली झाल्याचे समजते. मध्य प्रदेशातील सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार सिंगरौलीच्या महापौर राणी अग्रवाल यांचाही निवडणुकीत पराभव होत झाला.
चाहत पांडे यांचे डिपॉझिट जप्त
टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे यांचे डिपॉझिट जप्त झाले. चाहत यांनी जूनमध्ये आम आदमी पार्टीत सामील झाल्या होत्या. मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आहे. त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या जागेवरून भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या 36 हजार मतांनी विजयी झाले. त्यांच्यानंतर काँग्रेसचे अजयकुमार टंडन दुसऱ्या तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्रताप रोहित अहिरवार यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
AAP ला किती टक्के मते मिळाली?
छत्तीसगडमध्ये आम आदमी पक्षाला ०.९४ टक्के मते मिळाली आहेत. त्याचवेळी मध्य प्रदेशात पक्षाला 0.44 मते मिळाली आहेत. याशिवाय राजस्थानमध्ये ‘आप’ला 0.38 टक्के मते मिळाली आहेत