MPs Suspended : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचे निलंबन (MPs Suspended) केले गेले आहे. गेल्या चार दिवसात 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर काल (दि. 19 डिसेंबरला) आणखी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात महाराष्ट्रीत खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा समावेश आहे. आजच्या कारवाईनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 झाली आहे.
Pune : विश्वास नांगरे पाटील पुण्याचे पोलीस आयुक्त? ‘त्या’ व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा तर होणारच!
निलंबनानंतर खासदारांना संसद परिसरातही नो एन्ट्री!
त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये निलंबित करण्यात आलेल्या 49 खासदारांना संसदेच्या परिसरात देखील प्रवेश मिळणार नाही. यामध्ये संसद कक्ष, प्रेक्षक गॅलरी आणि लॉबीमध्ये देखील प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता निलंबित खासदारांना संसद परिसरात देखील जाता येणार नाही.
त्याचबरोबर ज्या संसदीय समित्यांचे हे निलंबित खासदार सदस्य आहेत. त्या बैठकीतून देखील त्यांना निलंबित केले जाईल. त्यांना समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. निलंबन काळातील त्यांची कोणतीही नोटीस स्वीकारली जाणार नाही. जर एखाद्या खासदाराला संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले असेल तर त्याला दैनंदिन भत्ते देखील मिळणार नाहीत. कारण खासदारांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन हे कायद्यानुसार कर्तव्यावर नसताना विचारात घेतली जाऊ शकत नाही.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पना धक्का! अध्यक्षपदाची निवडणूकच लढता येणार नाही; कारण काय?
नेमके कारण काय?
13 डिसेंबरला संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेला छेदत चार ते पाच जणांनी संसद आणि संसदेच्या आवारात गोंधळ घातला. यातील सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी लोकसभेत खासदारांच्या बसण्याच्या जागेवर उडी घेतली स्मोक अॅटॅक केला. तर नीलम आणि अमोल शिंदे यांनी संसदेच्या आवारात स्मोक कॅन्डल जाळल्या. त्यानंतर काही वेळातच या चारही जणांना पकडण्यात आले. याशिवाय या चौघांचे साथीदार ललित झा आणि विकी यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
विरोधकांची मागणी काय?
दुसरीकडे या प्रकरणी आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाकडूनही एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करावे अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात खासदारांनी नारेबाजी आणि पोस्टरबाजी करत सरकारचा निषेध केला.