Pune : विश्वास नांगरे पाटील पुण्याचे पोलीस आयुक्त? ‘त्या’ व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा तर होणारच!

Pune : विश्वास नांगरे पाटील पुण्याचे पोलीस आयुक्त? ‘त्या’ व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा तर होणारच!

Pune : राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पुण्यात नांगरे पाटील पोलीस आयुक्त म्हणून येणार अशा स्वरुपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, याबाबत खात्रीशीर माहिती काहीही नाही. परंतु, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसमुळे चर्चा मात्र जोरात सुरू झाल्या आहेत. विश्वास नांगरे पाटील त्यांच्या धडाकेबाज कारवायांसाठी ओळखले जातात. पोलीस दलात त्यांनी अशा अनेक कारवाया करुन गुन्हेगारांना जरब बसवला आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काही जरी बातमी कळली की त्याची मोठी चर्चा होते.

Pune News : भाडोत्री खोली देणाऱ्या जागामालकांच्या खिशाला झटका; मनपाचा करवाढीचा प्रस्ताव रेडी

बॉस लवकरच पुण्यात, असा मजकूर लिहिलेले स्टेटस या पदाधिकाऱ्याने त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवले होते. या सोबत नांगरे पाटील यांचा फोटोही होता. पुणे पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील येतील असा विश्वास या पदाधिकाऱ्यांना वाटतो. त्यामुळेच त्यांनी याबाबत गृहमंत्रालयाचा आदेश येण्याआधीच या चर्चा घडवून आणल्या आहेत. विश्वास नांगरे पाटील सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

गृहमंत्रालयाचा आदेश निघण्याआधीच ही माहिती कशी कळते हा प्रश्न अजूनही कायम आहे. दुसरीकडे सध्या रितेशकुमार पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा कार्यकाळ अजून पूर्ण झालेला नाही. मात्र त्यांना पदोन्नती दिली जाऊ शकते अशा चर्चा सुरू आहेत. जर त्यांना पदोन्नती दिल्यास पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी कुणाला द्यायची, हा प्रश्न राहतो. यावर अद्याप काहीच हालचाली नाहीत.  तरी देखील पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचे नाव पुढे येऊ लागल्याने या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता मावळली, हायकोर्टाकडून आदेशात मोठा बदल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube