Download App

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या ट्रेडमार्कसाठी अर्ज अन् काही तासातच अंबानींची माघार

  • Written By: Last Updated:

Mukesh Ambani owned Reliance Industries application for ‘Operation Sindoor’ as a work mark : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी (दि.७) ट्रेडमार्क रजिस्ट्रीमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ या शब्दाच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे. दाखल अर्जामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ हे शब्द वर्क मार्क म्हणून नोंदले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तावर भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता हे नाव ट्रेडमार्क करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींसह (Mukesh Ambani) इतरांकडून अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अर्ज केल्यानंतर अवघ्या काही तासातच अंबानींकडून दाखल अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्जात नेमकं काय?

रिलायन्स इंडस्ट्रीजसह अन्य कंपन्यांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जात ‘ऑपरेशन सिंदूर’ या शब्दांची नोंदणी ‘वस्तू आणि सेवा’ अंतर्गत वर्ग ४१ अंतर्गत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये शिक्षण आणि मनोरंजन सेवांचा समावेश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या नोंदणीसाठी अंबांनींशिवाय मुकेश चेतराम अग्रवाल, ग्रुप कॅप्टन कमल सिंग ओबेरॉय (निवृत्त) आणि आलोक कोठारी या तिघांनी अर्ज केले आहे. पण आता अंबानींकडून दाखल अर्ज मागे घेत असल्याचे म्हटले आहे. नेमका हा अर्ज कोणत्या कारणामुळे मागे घेण्यात येत आहे याबाबत रिलायन्सकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

ऑपरेशन सिंदूरनंतर हाय अलर्ट, अंबानी-अदानींचं टेन्शन वाढलं! पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याची भीती

हुजूर अब बख्श दीजिए! ऑपरेशन सिंदूरचा दणका बसताच पाकिस्तान वठणीवर

ऑपेरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर पायाखालची जमीन सरकलेल्या पाकिस्तानकडून (Pakistan) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना फोन करून हुजूर अब बख्श दीजिए अशा विनवण्या करण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि आयएसआय प्रमुख असीम मलिक यांच्याकडून या विनवण्या करण्यात आल्या आहेत. असीम मलिक यांनी डोभाल यांच्याकडे आणखी कोणत्या विनंत्या केल्या हे स्पष्ट झालेले नाही.

भारताच्या हल्ल्याला हवे तसे प्रत्त्युत्तर द्या

एकीकडे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि आयएसआय प्रमुख असीम मलिक यांनी ऑपरेशन सिंदूरचा दणका बसल्यानंतर अजित डोभाल (Ajit Doval) यांना फोन करून माफ करण्याची विनवणी केली जात आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तान सैन्याला फ्री हँड देत भारताच्या हल्ल्याला हवे तसे प्रत्युत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच भारताने पाकवर युद्ध लादले असून, त्याला निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल असे शरीफ यांनी म्हटले आहे.

follow us