Download App

मोठी बातमी, पाकिस्तानी एअर डिफेन्स उद्ध्वस्त, भारताचा थेट लाहोरवर ड्रोन हल्ला

Opration Sindhoor :  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) राबवत पाकिस्तानमधील

Opration Sindhoor :  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याने 7 मे आणि 8 मेच्या रात्री भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, पाकिस्तानने  पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स आणि रडार यंत्रणा (Pakistan Air Defence Systems) उद्ध्वस्त केली असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. याबाबत भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून 7 आणि 8 मे च्या रात्री अमृतसर, अवंतीपूरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना येथे असलेल्या लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. HQ-9 ही हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

माहितीनुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील एअर डिफेन्स रडार आणि सिस्टमवर टार्गेट केला होता. तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून 7 आणि 8 मे 2025 च्या रात्री अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र या सर्व हल्ल्यांना भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले.

नालेसफाईची कामे बेभरवशाची,आशिष शेलार कामाबाबत असमाधानी 

ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देताना पाकिस्तानातील लष्करी ठिकाणांना टार्गेट करण्यात आलेले नाही त्यामुळे पाकिस्तानने भारतच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले तर भारताकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल अशी माहिती  पत्रकार परिषदेमध्ये भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती.

follow us

संबंधित बातम्या