Video : काँग्रेस के शेर झुकते नहीं; नरेंदर सरेंडर म्हणत राहुल गांधींचा PM मोदींवर ‘वर्मी’ घाव….

राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात संघटन पातळीवर मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १० जूनपासून सुरू होईल आणि राज्यात ३०

Video : काँग्रेस के शेर झुकते नहीं; नरेंदर सरेंडर म्हणत राहुल गांधींचा PM मोदींवर 'वर्मी' घाव....

Rahul Gandhi on PM Narendra Modi : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास साक्षी आहे, भाजप-आरएसएसचे हेच चरित्र आहे. (Modi) ते नेहमीच झुकतात. अमेरिकेच्या धमकीला न जुमानता भारताने १९७१ मध्ये पाकिस्तान तोडला. काँग्रेसचे बब्बर शेर आणि सिंहीणी महासत्तेविरुद्ध लढतात, ते कधीही झुकत नाहीत असा थेट प्रहार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते भोपाळमध्ये आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

चार बैठका घेतल्या

राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात संघटन पातळीवर मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १० जूनपासून सुरू होईल आणि राज्यात ३० जूनपर्यंत सुरू राहील. यासाठी काँग्रेसने प्रत्येक निरीक्षकाला एका जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. राहुल यांनी ६ तासांत चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. रवींद्र भवनमध्ये ब्लॉक-जिल्हा अध्यक्षांना संबोधित करताना त्यांनी संघटना मजबूत करण्याबद्दल सर्वांशी संवाद साधला.

मोदींना फोन लावा; राहुल गांधींवरील टीकेवरुन यशोमती ठाकूर संतापल्या, सत्यजित तांबेंना दिलं चॅलेंज

निवडणुकीत तिकिटासाठी संघटनेचे मत महत्वाचं आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीवर काँग्रेस समित्या मजबूत करण्याबद्दलही ते बोलले. नवीन पिढीलाही संधी दिली जाईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिकिटांसाठी संघटनेला महत्त्व दिले जाईल. संघटनेकडून ज्यांचेही नाव पुढे येईल त्याला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाईल. यापूर्वी त्यांनी काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची (पीएसी) बैठक घेतली. दरम्यान, मला असे १० नेते दिसतात ज्यांच्याकडे मध्य प्रदेशात नेतृत्व करण्याची आणि सरकार स्थापन करण्याची क्षमता आहे असं राहुल गांधी म्हणाले.

मुख्यमंत्री मोहन यादव यांची टीका

राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. यावेळी त्यांनी बूट घातले होते. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधींनी त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांना पुष्पांजली वाहताना त्यांचे बूट काढले नाहीत. हे आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. त्यांनी थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे.

follow us