Mukesh Ambani met Rahul Gandhi : रिलायन्स इंड्रस्टीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आज (दि. 4 जुलै) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भेट घेतली. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलं. मात्र, या भेटीचे कारण राजकीय नसून कौटुंबिक असल्याचे समोर आलं.
Srikanth: थिएटरनंतर आता ‘श्रीकांत’ची काळी जादू ओटीटीवर; राजकुमारचा चित्रपट कधी आणि कुठे? वाचा
मुंकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा सुरू झाला आहे. 12 जुलै रोजी ते लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नासाठी देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रण पत्रे पाठवली जात आहेत. मुकेश अंबानी स्वतः लग्नासाठी काही पाहुण्यांना आमंत्रित करत आहेत. गुरुवारी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेली. मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी यांनी आपला मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाचे आमंत्रण त्यांना दिले.
#WATCH | Delhi: Industrialist Mukesh Ambani leaves from 10 Janpath (the residence of Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi).
As per sources, he has presented Sonia Gandhi, an invitation card to the wedding of his son Anant Ambani. pic.twitter.com/tycvHQzNr0
— ANI (@ANI) July 4, 2024
मुख्यमंत्री शिंदे यांनाही निमंत्रण
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या विधींनाही 3 जुलैपासून सुरुवात झाली होती.
प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार
या वर्षी मार्चमध्ये गुजरातमधील जामनगरमध्ये राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा पहिला प्री-वेडिंग फंक्शन आयोजित करण्यात आला होता. यानंतर या जोडप्याचा दुसरा प्री-वेडिंग फंक्शन नुकताच इटलीमध्ये पार पडला. लग्नाआधीच्या भव्य कार्यक्रमानंतर आता अनंत अंबानी यांचं विधीवत लग्न होणार आहे. येत्या 12 जुलै रोजी हा विवाहसोहळा पार पडणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी अँटिलिया येथे सुरू झाली आहे. लग्नाच्या तयारीत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.
या विवाह सोहळ्याला बॉलिवूड, राजकारण, व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कार्यक्रम भव्य आणि संस्मरणीय ठरणार आहे.