वजन कमी करण्याची सर्जरी करा, देशमुखांच्या प्रश्नांवर मुश्रीफ म्हणाले, मी व्यायाम करून…; विधानसभेत जुंगलबंदी

वजन कमी करण्याची सर्जरी करा, देशमुखांच्या प्रश्नांवर मुश्रीफ म्हणाले, मी व्यायाम करून…; विधानसभेत जुंगलबंदी

Anil Deshmukh on Hasan Mushrif : विधानसभेत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) आणि आमदार अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) कारभारावरून सरकारवर जोरदार टीका केली. ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झाल्याची टीका धंगेकरांनी केली. तर देशमुखांनी वजन कमी करण्याच्या सर्जरीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) वजन कमी करण्यासाठी सुसनमध्ये जावं, असा सल्ला दिला. त्यावर मी व्यायाम करून वजन कमी करेल, अशी मिश्किल टिप्पणी मुश्रीफांनी केली.

T20 WC : मोदींनी पुन्हा संधी साधली; जगजेत्या संघाला मान देत जिंकली करोडोंची मनं 

आज सभागृहात बोलताना धंगेकरांनी ससूनच्या कारभारावरून सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, मी आठवड्यातून दोनदा ससूनमध्ये जातो. ससूनशी माझा रोजचा संबंध आहे. ससून रुग्णालयाचे बजेट हे आपल्या सर्वात नामवंत रुग्णालयांचं जे बजेट आहे, तेवढं आहे. मात्र, असं असूनही अनेक रुग्णांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत. ससून गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. मागील वेळी डॉक्टर पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यांच्यावर काय कारवाई होणार? असा सवाल धंगेकर यांनी केला.

आमदारांचा निरोप समारंभ अन् देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले, जयंत पाटील हे कधी आमच्या … 

त्यावर बोलतांना मुश्रीफ म्हणाले की, मी सर्व लोकप्रतिनिधींना ससून रुग्णालयाच्या भेटीसाठी घेऊन जाईन. संपूर्ण ससून रुग्णालयाची व्यवस्था कशी चांगली हे दाखवणार आहे.

यावेळी देशमुखांनीही मुश्रीफांवर जोरदार टोलबाजी केली. ते म्हणाले, ससून हॉस्पिटलमध्ये बेरिएट्रिक सर्जन म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणार का? आणि आपण तिथे पेशंट म्हणून जाणार का?, असा सवाल देशमुख यांनी केला.

देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, अध्यक्ष महोदय मी घाबरलो का? की, बहुतेक असं वजन कमी केलेल्या लोकांच्याही तक्रारी आल्या. त्यामुळेच मी बॅरिएट्रिक सर्जरी केली नाही. माझे वजन वाढले तर मी व्यवस्थित व्यायाम करून वजन कमी करेन. तुम्ही (अनिल देशमुख) काळजी करू नका, असा टोला मुश्रीफांनी देशमुखांना लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube