‘टीका करणं विरोधकांचं कामच पण आम्ही..,’; हसन मुश्रीफांचा टोला
Hasan Musrif News : मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप तर दुसरीकडे महायुतीकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता विरोधकांच्या टीकेला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Musrif News) यांनी सौम्य शब्दांत टोला लगावला आहे. टीका करणं विरोधकांचं कामच आहे, पण आम्ही काम करत राहणार असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
मुश्रीफ म्हणाले, आम्ही सत्तेत जाऊन सहा महिने झाली आहेत. आत्तापर्यंत सरकारने अनेक मोठ-मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून टीका होत असते. टीका करणं हे विरोधकांचं कामच असून आम्ही आमचं काम करत राहणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे.
कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ
राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. एकाच वर्षांत दोन वेळा पीक कर्ज घेतलं आहे. ही तांत्रिक बाब आलेली आहे. मात्र, सर्वांना अनुदान मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे पात्र-अपात्र ठरलेल्या सर्वांना अनुदान मिळणार असल्याचं हसन मुश्रीफांनी सांगिललं आहे.
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप आणि शिंदे गटासोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचाच पुढाकार असल्याचा गौप्यस्फोट हसन मुश्रीफ यांनी केला होता. एवढच नाहीतर शरद पवार गटामध्ये जितेंद्र आव्हाड यांना कोणीही विचारत नसल्याची टीकाही करण्यात आली होती.
भाजपच्या आमदार-खासदारांना एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय का? अतुल लोंढेंचा सवाल
PM मोदींना कोणीही अडवू शकणार नाही :
2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही आडवू शकणार नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही असाच एक्झिट पोल सांगण्यात आला होता. पण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे एक्झिट पोल सांगेल तसंच होत नसतं, त्यामुळे 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून कोणी अडवू शकत नसल्याचं हसन मुश्रीफांनी ठणकावून सांगितलं आहे.