Mukhtar Aansari died : कुख्यात गॅंगस्टर मुख्तार अन्सारी ( Mukhtar Aansari died ) याचा मृत्यू झाला आहे. तुरूंगामध्ये शिक्षा भोगत असतानाच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तब्बत 14 तास त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला.
Horoscope Today: ‘कुंभ’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
अन्सारी हा सध्या उत्तर प्रदेशातील बांदा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याच्या मृत्यूने गुन्हेगारी जगातील प्रकरण संपुष्टात आलं आहे. तर राजकीय वर्तुळात देखील तो तेवढाच सक्रीय होता. वेग-वेगळ्या पक्षांच्या तिकीटांवर निवडणूक लढवत तो तब्बल पाच वेळा आमदार राहिला आहे. तीन निवडणुका तर त्याने जेलमध्ये असताना देखील तो निवडून आला होता.
अजितदादांचे खास प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा; 840 कोटींप्रकरणात सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
त्याच्यावरती खूनापासून खंडणीपर्यंत तब्बल 65 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यातीलच काही आरोपांखाली न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती. मात्र न्यायालयात सुनावणी दरम्यान अन्सारीने तुरुंगात आपला खून करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्याने म्हटलं होतं की, जेवणातून आपल्याला सौम्य स्वरूपात विष देण्यात येत आहे.
त्यामुळे माझी प्रकृती बिघडत आहे. त्यावर न्यायालयाने प्रशासनाकडून अन्सारीचा संपूर्ण अहवाल देखील मागवला होता. दरम्यान अन्सारीच्या मृत्यूनंतर गाजीपुर, मऊ आणि इतर संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. तसेच गाजीपुर, मऊ मधील काही भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.