अजितदादांचे खास प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा; 840 कोटींप्रकरणात सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

  • Written By: Published:
अजितदादांचे खास प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा; 840 कोटींप्रकरणात सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

CBI closed a 2017 corruption case Against Praful Patel : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खास असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयने एक मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पटेलांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वीच्या एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्त्वावर घेण्याच्या करारात 840 कोटींची अनियमितता आढळून आली होती. या प्रकरणात काही अधिकारी व प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई झाली होती. आता सीबीआयने (CBI)यात क्लोजर रिपोर्ट कोर्टात दिला आहे.

तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण?

यूपीए दोनच्या या सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल हे विमान वाहतूक मंत्री होते. त्यावेळी सरकारी कंपनी एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्वावर घेण्यासाठी करार करण्यात आला होता. त्यावेळी खूप सारी विमाने घेण्यात आली होती. त्यावेळी विमान कंपन्यांशी बेकायदेशीर करार केल्याचा आरोप पटेलांवर होत होता. याप्रकरणात 2017 मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. या करारामुळे सरकारचे तब्बल 840 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप होता.

Lok Sabha Election : नवनीत राणांना कडव्या विरोधानंतर भाजपसाठी अमरावती जड?

कोर्टाच्या आदेशानुसार पटेल व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने गुन्हे नोंदविले होते. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होते. परंतु पटेल व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध पुरावे आढळत नसल्याचे सांगत सीबीआयने कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळे गुन्हाचा तपास बंद होणार आहे. त्यामुळे एेन निवडणुकीचा काळात प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळाला आहे.

प्रफुल्ल पटेलांवरून रोहित पवारांचे डिवचणारे ट्वीट

ज्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला आणि नंतर अजितदादांच्या कानी लागून सातत्याने पाठपुरावा केला ती CBI ची क्लिनचीट अखेर भावी ‘लेखकांना’ मिळाल्याचे दिसतेय. अनेक दिवसांपासून लोकांसाठी सकारात्मक बातम्या येत नसल्या तरी आजची बातमी बघून प्रफुल्ल पटेल साहेबांना ‘मिर्ची’ही गोड लागेल. या गोड बातमीबद्दल प्रफुल पटेल साहेबांचं अभिनंदन, असे डिवचणारे ट्वीट रोहित पवारांनी केलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube