तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण?

तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण?

Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यंदाही अनेक दिग्गज नेते मंडळी तसेच निवडणूक (Elections 2024) जिंकण्याचं तंत्र माहिती असलेले उमेदवार आहेत. निवडणूक जिंकायचीच या इराद्याने शड्डू ठोकलेलही उमेदवार आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठीच तर निवडणूक लढवत असतो. पण, जरा थांबा यंदाच्या निवडणुकीत असाही एक चमत्कारीक उमेदवार आहे ज्याने निवडणुकीत पराभूत होण्याचा रेकॉर्ड केला आहे. होय हे खरं आहे. तामिळनाडूतील मेट्टूर येथील रहिवासी के. पद्मराजन असेच (K. Padmarajan) खास उमेदवार आहेत. तब्बल 238 वेळा पराभूत होत पद्मराज जगातील सर्वात मोठे इलेक्शन लूजर बनले आहेत. आता त्यांनी पराभवाची चिंता न करता पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.

Lok Sabha Election : काँग्रेसच्या मदतीला ‘हनुमान’, 2024 मध्ये भाजपाचं 25 चं स्वप्न भंगणार?

पद्मराजन टायर दुरुस्तीचे दुकान चालवतात. त्यांनी 1988 मध्ये निवडणूक लढण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी केली. जिंकण्याचा प्रयत्न करतात पराभव झाला तरी त्याची चिंता ते करत नाहीत. पुढील निवडणुकीची तयारी करतात. त्यामुळे निवडणुकीतील जय पराजयाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही.

पद्मराजन यांच्यावर लोक हसतात परंतु या गोष्टींचा ते विचार करत नाहीत. सर्वसामान्य माणूस देखील निवडणूक लढवू शकतो हेच मला यातून सिद्ध करायचं आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीत विजय हवा असतो. माझ्यासाठी मात्र निवडणूक लढणे हाच विजय आहे. पराभव झाल्यानंतरही मला आनंद होतो, असे पद्मराजन सांगतात.

निवडणूक लढण्याने पद्मराजन आता इलेक्शन किंग म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. यंदा पद्मराजन तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून ते स्थानिक पातळीवरील निवडणूक त्यांनी लढली आहे. यावर स्पष्टीकरण देताना पद्मराजन म्हणतात माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे ही गोष्ट माझ्यासाठी कधीच महत्वाची नव्हती.

लोकसभेसाठी अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मंत्री, माजी मंत्र्यांची भलीमोठी यादी पाहाच

सर्वसामान्य माणसासाठी निवडणूक लढणे सोपी गोष्ट नाही. उमेदवारी अर्ज भरताना 25 हजार रुपये डिपॉझिट म्हणून भरावे लागतात. यानंतर निवडणुकीत 16 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तरच ही रक्कम उमेदवाराला परत मिळते अन्यथा डिपॉजिट जप्त होते. निवडणुकीत सर्वाधिक पराभव झाल्याने पद्मराजन यांचे नाव लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले आहे. 2011 च्या निवडणुकीत पद्मराजन यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले होते. मेट्टूरमध्ये विधानसभेची ही निवडणूक होती. या निवडणुकीत पद्मराजन यांना 6 हजार 273 मते मिळाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज