Lok Sabha Election : काँग्रेसच्या मदतीला ‘हनुमान’, 2024 मध्ये भाजपाचं 25 चं स्वप्न भंगणार?
Rajasthan Lok Sabha Election : मागच्या आठवड्यातील घटना आहे. म्हणावं तर बातमी छोटीशीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी भाजपला डोकेदुखी ठरणारी आहे. राजस्थानच्या रणांगणात (Rajasthan Lok Sabha Election) आणखी एका मित्राने भाजपला धक्का दिला आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे म्हणवले जाणारे हनुमान अर्थात राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल आता (Hanuman Beniwal) काँग्रेसच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यांची आणि काँग्रेसची ही नवी मैत्री साधीसुधी नाही तर यंदा भाजपाच्या राजस्थानातील हॅटट्रीकममधील अडथळा ठरू शकते.
याआधी हनुमान बेनिवाल भाजपबरोबर होते तेव्हा त्यांच्या मदतीने भाजपाने राजस्थानातील सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. हनुमान बेनिवाल यांनी त्यावेळी काँग्रेसच्या (Congress Party) विरोधात आक्रमक प्रचार केला होता. आता हेच बेनिवाल काँग्रेसचे मित्र झाले आहेत. त्यांची राजकीय ताकद ओळखण्यात काँग्रेसची चुकली नाही. त्यांच्यासाठी तत्काळ एका जागेचा त्याग केला. त्यांच्या काँग्रेससोबत जाण्याने 2024 मध्ये भाजपाचे 25 चे स्वप्न हनुमान तोडू शकतात अशी चिन्हे राजस्थानच्या रणांगणात दिसू लागली आहेत.
Lok Sabha Election: आघाडीचा धर्म पाळला जात नाही; भिवंडी, सांगलीवरून पटोलेंनी कुणाला सुनावले?
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसकडून राजस्थानातील उमेदवारांची घोषणा केली जात आहे. जयपूर ग्रामीण मतदारसंघातून अनिल चोपडा आणि करौली धौलपूर मतदारसंघातून भजनलाल जाटव यांना उमेदवारी दिली आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काँग्रेसने दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. काँग्रेसने नागौरची जागा हनुमान बेनिवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीसाठी तर सीकरची जागा माकपासाठी सोडण्याची घोषणा केली आहे.
नागौर मतदारसंघात हनुमान बेनिवाल यांचा चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे सध्या हनुमान बेनिवाल आणि त्यांच्या पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा मागील दोन निवडणुकांतील ट्रॅक रेकॉर्ड पाहून काँग्रेस नेत्याना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत.
देश में लोकतांत्रिक व्यवस्था की रक्षा के लिए हमने एक कदम बढ़ाया और एक कदम कांग्रेस पार्टी ने बढ़ाया और उसी के परिणामस्वरूप आज नागौर लोक सभा की सीट इंडिया गठबंधन में @RLPINDIAorg को दी गई है !इसके लिए राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी परिवार की तरफ से कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय…
— HANUMAN BENIWAL (@hanumanbeniwal) March 23, 2024
हनुमान बेनिवालमुळे भाजपला फायदा
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हनुमान बेनिवाल भाजपबरोबर होते. त्यावेळी राजस्थानात भाजपप्रणित एनडीए आघाडीने सर्व 25 जागांवर विजय मिळवला होता. याच पद्धतीने 2014 च्या निवडणुकीतही भाजपने सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. या दोन निवडणुकांचे ट्रॅक रेकॉर्ड पाहिले तर भाजपने अगदी क्लीन स्वीप केले होते. भाजपच्या या निवडणुकीतील विजयात हनुमान बेनिवाल यांचे मोठे योगदान राहिले. नागौर मतदारसंघात तर त्यांचा प्रभाव आहेच शिवाय युवक आणि शेतकऱ्यांतही लोकप्रिय आहेत.
शेतकरी नेते म्हणूनच त्यांना राजस्थानच्या राजकारणात ओळखले जाते. 2019 मध्ये जेव्हा बेनिवाल भाजपबरोबर आले त्यावेळी भाजपला त्यांच्या मैत्रीचा फायदा नागौर व्यतिरिक्त जोधपूर, बाडमेर, राजसमंद, जालोर, पाली आणि अजमेर मतदारसंघातही मिळाला. या काळात बेनिवाल यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सुद्धा केला होता. या फॅक्टरमुळे 2019 च्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा मिळाला.
Lok Sabha Election : नाशिक महायुतीत घमासान! गोडसेंचं शक्तीप्रदर्शन; भाजप इच्छुकांची मुंबईत धडक
हनुमान बेनिवाल आता काँग्रेस मित्र
आता राजकारणाने पलटी मारली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हनुमान बेनिवाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँगेसशी घरोबा केला आहे. आता याचा फायदा काँग्रेसला मिळणार आहे. जाट मतदारांना काँग्रेसकडे आणण्याचे कामही बेनिवाल आता करणार आहेत. वेळोवेळी भाजपवर आगपाखड करतानाही ते दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच त्यांनी एनडीएची साथ सोडली होती.
त्यांच्या जाण्याने आता भाजपसाठी अडचणी वाढल्या आहेत. हनुमान बेनिवाल काँग्रेससोबत गेल्याने लोकसभा निवडणुकीत क्लीन स्वीप हॅटट्रिक करणे भाजपला सहजसाध्य राहिलेले नाही. तर दुसरीकडे काँग्रेसच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. नागौर लोकसभेची जागा आरएलपी पक्षाला सोडण्यात आल्यानंतर हनुमान बेनिवाल यांनी ट्विट करत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.