आज दिवसभर महानगरपालिकांसाठी युती आघाडीचा खेळ रंगला; वाचा, युती कुठं झाली अन् कुठं फिस्कटली?

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने कुठं युती केली अन् कुठ नाही?

  • Written By: Published:
News Photo   2025 12 30T215606.036

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी (Election) आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी राज्यात वेगवेगळी समीकरणे पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी महामयुतीतील पक्षांनी युती केली आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनीही काही ठिकाणी आघाडी केली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी युती आणि आघाडीसाठी मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या, मात्र तोडगा निघाला नाही.

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती केली आहे. मुंबईतील 227 पैकी 90 जागांवर शिवसेना लढणार आहे, तर 137 जागांवर भाजप मैदानात उतरणार आहे. तसंच, दोन्ही पक्ष आपल्या मित्र पक्षांना आपल्याला कोट्यातून जागा दिल्या असल्याचं समोर आलं आहे. मुंबईसह ठाणे, जळगाव, नागपूर या प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी युती केली आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस! कुणी रडलं, कुणाची आत्मदहनाची धमकी तर कुणाची दगडफेक

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे.तर, काँग्रेसने वंचितसोबत युती केली आहे. या सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आता उद्या अर्जांची छाणनी होणार आहे, तर 2 तारखेपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. 3 तारखेला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होऊन चिन्हवाटप होणार आहे. 15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.

भाजप-सेना कुठ युती झाली?

मुंबई
ठाणे
जळगाव
पनवेल
नागपुर
भिवंडी
कोल्हापूर
चंद्रपूर
वसई विरार
कल्याण डोंबिवली
इचलकरंजी

भाजप-शिवसेना कुठं युती नाही?

पुणे
छत्रपती संभाजीनगर
नाशिक
नांदेड
अमरावती
मालेगाव
अकोला
मीरा-भाईंदर
नवी मुंबई
धुळे
उल्हासनगर
सांगली
जालना
पिंपरी चिंचवड
परभणी
सोलापूर
लातूर
अहिल्यागर

follow us