मुदत शिल्लक असतांनाच राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा

  • Written By: Published:
मुदत शिल्लक असतांनाच राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा

Prafulla Patel NCP Rajya Sabha Candidate :राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार हे अखेर स्पष्ट झाले आहे. प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. पटेल हे उद्या दुपारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. सध्या पटेल हे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ बाकी असतांनाच आता नव्यानं उमेदवारी दिल्यानं अजित पवार गटात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुदत शिल्लक असतांनाच राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा 

प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र. पटेल सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच पटेल यांनी राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरतील. काही तांत्रिक अडचणींमुळे मुद्दे असल्यानं हा निर्णय घेत आहोत, असं प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सांगितलं. मात्र कार्यकाळ संपण्याच्या 3 वर्षे आधीचा हा निर्णय का घेतला गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केजरीवालांना ईडीचे सहावे समन्स, १९ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानं वाद टाळण्यासाटी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यसभेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दीकी यांच्यासह 8-10 उमेदवार इच्छुक होते. त्यामुळं इतर कोणाला उमेदवारी देऊन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजी नाट्य नका म्हणून राष्ट्रवादीने पटेल यांना उमेदवारी दिली असावी, अशी चर्चा आहे.

दरम्यान, पटेल हे गेल्या चार दशकांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर गोंदिया महापालिकेचे सभापती झाले. वयाच्या ३३ व्या वर्षी ते काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत पटेल हे शरद पवार यांच्यासोबत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला, त्यावेळी पटेलही अजित पवारांसोबत गेले.

महायुतीचे सहा उमेदवार जाहीर

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी महायुतीने आपले 5 उमेदवार आज जाहीर केले होते. भाजपने आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपछडे यांना भाजपने उमेदवारी दिली. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा आणि आता राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे उमेदवार असतील.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube