ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे; आंबेडकरांची भूमिका स्पष्ट

ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे; आंबेडकरांची भूमिका स्पष्ट

Prakash Ambedkar News : कुणबी समाजाबाबत निर्णय झाला पण गरीब मराठ्यांना ओबीसींच्या ताटात घेता येणार नाही, ते टिकणारंही नाही त्यामुळे ओबीसी अन् गरीब मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मांडली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. त्यावरही बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध? भाजप चौथा उमेदवार देणार नाहीच; बावनकुळेंनी सांगून टाकलं

प्रकाश आंबेडकर म्हणाले, कुणबी समाजाबाबत मागील मागील महिन्यात झाला आहे. मात्र, गरीब मराठ्यांच्या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. गरीब मराठ्यांना ओबीसींच्या ताटात घेता येणार नाही, असं झालं तर ते आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे ओबीसी आणि गरीब मराठा समाजाचं ताट वेगळं पाहिजे, शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भात विशेष अधिवेशन बोलवणार असं सांगितलं जात आहे ते बोलवतील की नाही माहित नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

वरूण धवन ते साकिब सलीम या अभिनेत्याची ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल ब्लॅक ड्रेस फॅशन, पाहा फोटो…

तसेच आचारसंहिता आणि लोकसभा निवडणुकीआधी त्यांना बजेटसाठी एक अधिवेशन घ्यावं लागेल, हे फसवं राजकारण चाललं काय हे समजत नाही, य़ा शब्दांत आंबेडकरांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरुन टीका केली आहे. अशा परिस्थितीत आता आम्ही मनोज जरांगे यांना थेट निरोप पाठवला असून त्यांनी हा लढा शरीराचा त्याग करुन करण्यात काही अर्थ नाही त्यांनी स्वतंत्र निवडणूक यासाठी लढवावी. ज्या पक्षातून ते लढले त्या पक्षाचे बंधने येतात त्यामुळे गरीब मराठ्यांचा प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी, असंही ते म्हणाले आहेत. यासंदर्भात त्यांच्याबरोबर आमचे पदाधिकारी बोलणार असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

शनाया कपूर ते ऑर्री अनेक सिने तारकांनी लावली ‘लादुरी’च्या ओपनिंग इव्हेंटला हजेरी, पाहा फोटो

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळचे त्यांचे उपोषण अधिक कठोर आहे. कारण त्यांनी या काळात पाणी घेतलेले नाही तसेच औषधोपचारासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर त्यांना विनवणी करत आहेत मात्र जरांगे पाटील त्यांच्या निश्चयावर ठाम आहेत. त्यामुळे डॉक्टरही चिंतेत पडले आहेत. सरकारी अधकारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जरांगे यांनी कोणतीही तडजोड नाही आधी मागण्या पूर्ण करा आणि मगच या अशी भूमिका घेतली आहे. शिंदे-फडणवीस मराठ्यांची फसवणूक करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube