“मी नेहमीच भाजपसोबत होतो, मी कोणाचीही फसवणूक केली नाही. मी भाजपमध्ये होतो आणि नुकताच पुन्हा आलो आहे. अशा परिस्थितीत पक्षाकडून जे काही काम दिले जाईल ते मी करेल.” असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षांचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय (mukul roy) यांनी दिल आहे. मुकुल रॉय गेल्या काही दिवसापासून गायब असल्याच्या चर्चा होत्या.
टीएमसीचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर मुकल रॉय म्हणाले की, “आता मी टीएमसी सोबत नाही. मी याआधीच टीएमसीचा राजीनामा दिला आहे.” मुकुल रॉय यांच्या दाव्यानुसार ते सोमवारी (18 एप्रिल) च्या दिवशी काही वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीला गेले होते. पण ते ‘बेपत्ता’ झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यांच्या कुटुंबाने दावा केला की त्यांची ‘मानसिक स्थिती’ चांगली नाही आणि भाजपने अस्वस्थ असलेल्या टीएमसी नेत्याचा वापर करून गलिच्छ राजकारण करू नये.
या संपूर्ण प्रकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोणी दिल्ली किंवा पंजाबला जाणार की नाही यावर आम्ही कसं नियंत्रण ठेवायचे?
पायरसी, सिनेमॅटोग्राफीबाबत मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राष्ट्रीय क्वांटम मिशनला मंजुरी
रॉय यांचा मुलगा सुभ्रांगशु म्हणाले होते की, माझ्या वडिलांचे बोलणे मी ऐकले. पण त्यांना उपचाराची गरज आहे. त्याला शारीरिक समस्या आहेत. माझ्या वडिलांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू पाहणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. त्यावर रॉय म्हणाले की, शुभ्रांशूनेही भाजपमध्ये जावे कारण तेच त्यांच्यासाठी चांगले होईल.
काही काळापासून माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी राजकारणापासून दूर होतो. मात्र आता मी बरा असून मी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे रॉय यांनी सांगितले. ते म्हणाले की पुढे तृणमूल काँग्रेसशी आणि माझा कधीही संबंध राहणार नाही, याची मला 100 टक्के खात्री आहे.
Atiq Ahmed : अतिक अहमदच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात उमटले…