Atiq Ahmed : अतिक अहमदच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात उमटले…

Atiq Ahmed : अतिक अहमदच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात उमटले…

देशभरात चर्चेत असलेल्या अतिक अहमद आणि अशरफ हत्याकांडाचं काही लोकांकडून समर्थन केलं जातंय तर काही लोकांकडून विरोध केला जात असल्याचं समोर आलंय, महाराष्ट्रातल्या बीडमध्ये एका बॅनरवर अतिक अहमद आणि भाऊ अशरफचा शहीद असा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशातल्या अतिक अहमदसह त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. बीडमधील माजलगावमध्ये एका बॅनरवर अतिक अहमदचा शहीद असा उल्लेख केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Today Horoscope : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आज बँकेचे व्यवहार जपून करावेत!

पोलिसांच्या माहितीनूसार, अतिक अहमद आणि अशरफच्या हत्येनंतर माजलगावमध्ये काही लोकं बॅनर घेऊन आले. बॅनरमध्ये अतिक अहमद आणि अशरफ या दोघांनाही शहीद दाखवण्यात आले होते. त्यासोबतच बॅनरवर एका वृत्तपत्राचे कटिंगही दर्शवण्यात आले होते.

‘आता तर कुठं अजितदादा हसायला शिकले, त्यांना आणखी हसवा, ते तुमच्याशी…’

बॅनरबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच हे तिथून हटवले. पोलिसांनी सांगितलं की, मोहसीन भैय्या मित्र मंडळाने हे बॅनर लावले होते. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या मोहसीन पटेलचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने बॅनर लावलेल्या दोन जणांसह बॅनर आणि कटींग जप्त केलं असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच एका वृत्तपत्राच्या संपादकासह रिपोर्टवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर कलम 294 , 295, 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube