पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर; वाचा सविस्तर
Pune Unauthorized Schools : पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये बारा शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचा अहवाल शिक्षण विभागाला दिला आहे. पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या शाळांची मनमानी थांबविण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे. अहवालाच्या आधारे पुणे जिल्ह्यात 12 शाळा अनधिकृतपणे कार्यरत आहेत.
शासनाची मान्यता न घेता, कागदपत्रांची पुर्तता न करता शाळा सुरु करण्याचे प्रकार गेल्या काही काळापासून सुरु आहेत. याविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये दाखल करु नये, असे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
अनधिकृत शाळांची यादी
1) मंगेश मेमोरिअल इंटरनॅशनल स्कूल, दौंड,
2) क्रेयांस प्री-प्रायमरी स्कूल, कासुर्डी (दौंड),
3) के. के. इंटरनॅशनल स्कूल, बेटवाडी (दौंड),
4) पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, लोणी काळभोर (हवेली),
5) जय हिंद पब्लिक स्कूल, भोसे (खेड),
6) एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, बावधन (मुळशी), 7) अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे (मुळशी),
8) साई बालाजी पब्लिक स्कूल, नेरे (मुळशी),
9) श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल, वीर (पुरंदर),
10) कल्पवृक्ष इंग्लिश मीडियम स्कूल, किरकिटवाडी (हवेली),
11) क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हेवाडी (हवेली), 12) किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल, खडकवासला (हवेली).