Muralidhar Mohol Appoint as Tamilnadu Assembly elections co- incharge : केंद्रिय राज्यमंत्री आणि पुण्याचे भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर आता भाजपकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. ही जबाबदारी म्हणजे मोहोळ यांच्यावर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना सह प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मोठी बातमी, शाहरुख अन् गौरी खानविरुद्ध मानहानीचा खटला, समीर वानखेडे यांचा मानहानीचा आरोप
आज दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. त्यानिमित्त भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभेची जबाबदारी काही नेत्यांना वाटून देण्यात आली आहे. त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि मुरलीधर मोहोळ या तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
यामध्ये तामिळनाडूच्या विधानसभेची जबाबदारी देताना बैजयंत पांडा यांना प्रभारी तर केंद्रिय राज्यमंत्री आणि पुण्याचे भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर बिहार विधानसभेसाठी प्रभारी म्हणून धर्मेंद्र प्रधान तर सह प्रभारी म्हणून सी आर पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगालसाठी भूपेंद्र यादव यांना प्रभारी तर खासदार बिप्लब कुमार देब यांच्यावर सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
https://x.com/BJP4India/status/1971140261196804430
या आगामी तीनही राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत यामध्ये बिहारच्या निवडणुका नोव्हेंबर 2025 मध्ये तर मे 2026 मध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभेची निवडणुक होणार आहे. दरम्यान या नियुक्त्यांवरून अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत की, या जबाबदाऱ्या मिळालेल्या धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि मुरलीधर मोहोळ या तीन नेत्यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे.