नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडातील दोन आरोपी दुरान मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग यांचा रविवारी कैद्यांमध्ये झालेल्या वादात तुरुंगातच मृत्यू झाला आहे. या चकमकीत केशव यादव नावाचा गुंडही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही सिद्धू मूसवाला हत्याकांडातील आरोपी आहेत आणि त्यांना पंजाबच्या गोइंदवाल तुरुंगात ठेवण्यात आले होते.
दरम्यान या हत्याकांडानंतर जखमींना कडेकोट बंदोबस्तात हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ जगजीत सिंग यांनी सांगितले की, तुरुंगातून आणलेल्या तीन जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर तिसर्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला अमृतसरच्या गुरू नानक देव हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षेत पाठवले जाईल.
सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपींना तुरुंगात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. मात्र, दोन गुंडांच्या हत्येमुळे सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेत आरोपींनी लोखंडी रॉडचा वापर केला. एसएसपी गुरमीत सिंह चौहान यांनी सांगितले की, या प्रकरणाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Jalgaon : पेन ड्राईव्ह प्रकरणात गाजलेले माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना अटक
सिद्धू मुसेवाला मर्डर केस
29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडात असलेल्या गोल्डी ब्रार या गुंडाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. गोल्डी ब्रार तिहार तुरुंगात बंद असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा खास आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन! सत्ताधारी-विरोधक भिडणार
गोल्डी ब्रार म्हणाला की, मित्र विकी मिड्दुखेडा याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची हत्या करण्यात आली. 2021 मध्ये मिड्दुखेडा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स टोळीचा असा आरोप होता की सिद्धू मुसेवालाने विकी मिड्दुखेडाच्या मारेकऱ्यांना आश्रय दिला होता. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे.