Download App

मस्कचा मोठा निर्णय, ट्विटरच्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयांना टाळे!

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून वाद काही त्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आहे. मस्क यांच्या भूमिकेवरुन ट्विटर आणि ट्विटर बाहेरील जगतात वादंग उठले आहे. त्यांच्या भूमिकेविरोधात जगभरातून टीका होत असतांनाच मस्क यांनी भारतातील ट्विटरचे कार्यालये बंद (Twitter offices closed) करण्याचा निर्णय घेतला.

ट्विटरने शुक्रवारी (दि.१७) सकाळी देशातील तीनपैकी दोन कार्यालये बंद केल्याचे वृत्त ब्लूमबर्ग या वृत्त संस्थेने दिले आहे. यासोबतच कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. खर्च कमी करण्यासाठी ट्विटरने हे पाऊल उचलले आहे. हे दोन ऑफिस मुंबई व दिल्लीतील आहेत. जेव्हा कर्मचारी कार्यालयात पोहचले, तेव्हा त्यांना घरी पाठवण्यात आले

मस्क यांनी 44 बिलियन डॉलरला ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मस्क यांनी सर्वप्रथम कंपनीचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले. याशिवाय त्यांनी कंपनीतील इतरही अनेक टॉप अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. दरम्यान, आता ट्विटरने भारतील तीन ट्विटर कार्यालयांपैकी दोन कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील नवी दिल्ली आणि मुंबई येथील ट्विटरची कार्यालये बंद होणार असून, केवळ बंगळूर येथील ट्विटर कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे.

“आमचा राम राम घ्यावा” भगत सिंग कोश्यारी यांचा राजभवनात शेवटचा दिवस

ट्विटरमध्ये साडेसात हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी अर्ध्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ट्विटरचे भारतात २०० कर्मचारी होते. त्यात कपात करण्यात आलीय. आता केवळ तीन कर्मचारी उरले आहेत. या तीन कर्मचाऱ्यांपैकी एक जण कन्ट्री टीम लीडर आहे. अन्य दोघांमध्ये नॉर्थ आणि ईस्ट तर दुसऱ्याकडे साऊथ झोन दिले आहे. या कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. तर भारतातील ट्विटरचे सर्व काम हे दक्षिणेतून म्हणजेच बंगळुरू मधून सुरू राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. कंपनी खर्च कपात करण्यासाठी मस्क यांनी हा निर्णय घेतल्याची यातून स्पष्ट होत आहे.

Tags

follow us