“आमचा राम राम घ्यावा” भगत सिंग कोश्यारी यांचा राजभवनात शेवटचा दिवस

- महाराष्ट्राचे सर्वाधिक गाजलेले राज्यपाल म्हणता येईल असे भगतसिंह कोश्यारी यांचा आज राजभवनातील शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी ते उत्तराखंडला रवाना होणार आहे.
- राज्यपाल पदाच्या आजच्या शेवटच्या दिवशी भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील मुंबादेवी व श्री बाबुलनाथचे दर्शन घेतले.
- भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली.
- विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हेदेखील संध्याकाळी मुंबईत येणार आहेत. नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी राजभवन येथील दरबार हॉलमध्ये दुपारी 12.40 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
- सर्व फोटो / राज्यपाल कार्यालय