मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष, राहुल गांधींच्या विधानावर भाजप नेते संतापले…

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुस्लिम लीग पक्षावर केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राहुल गांधींच्या या विधानावर नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान राहुल गांधी सहा दिवसांच्या वॉशिंग्टन दौऱ्यावर आहेत. Kon Honar Karodpati: सचिन पिळगावकरांनी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना देखील टाकलं मागे यावेळी एका मुलाखतीत बोलताना त्यांनी मुस्लिम लीगवर भाष्य केलं आहे. […]

Rahul GAndhi

Rahul GAndhi

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुस्लिम लीग पक्षावर केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राहुल गांधींच्या या विधानावर नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान राहुल गांधी सहा दिवसांच्या वॉशिंग्टन दौऱ्यावर आहेत.

Kon Honar Karodpati: सचिन पिळगावकरांनी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना देखील टाकलं मागे

यावेळी एका मुलाखतीत बोलताना त्यांनी मुस्लिम लीगवर भाष्य केलं आहे. मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचं ते म्हणाले आहेत. राहुल गांधींना केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीगसोबत काँग्रेसची असलेल्या युतीबाबत विचारण्यात आलं होतं.

Junior Hockey Asia Cup : भारताच्या युवा ब्रिगेडने पाकिस्तानचा पराभव करत ज्युनियर हॉकी एशिया कप जिंकून रचला इतिहास

राहुल गांधी यांच्या या विधानाचा भाजप नेत्यांनी निषेध केला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींच्या विधानावर त्यांची मजबूरी असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्ष म्हणणं ही राहुल गांधींची मजबूरी असल्याचं ते म्हणाले आहेत.

डबल इंजिन सरकारचा मी ड्रायव्हर, ज्याला बसायचं त्यानं…; दानवेंची टोलेबाजी

मुस्लिम लीग धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करण्यासाठी जबाबदार पक्ष आहे. वायनार्डमध्ये हितसंबंध ठेवण्यासाठी त्यांनी मजबूरीने हे विधान केलं आहे. तर दुसरकीडे अमित मालवीय यांच्या प्रतिक्रियेवर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी खोचक टोला लगावला आहे.

कर्नाटकच्या घशाला कोरड : CM शिंदेंना पत्र लिहीत महाराष्ट्राकडे मदतीची याचना

तुम्ही अडाणी आहात. तुम्हाला केरळचा मुस्लिम लीग आणि जिन्नांच्या मुस्लिम लीगमधील फरक माहिती नाही. जिन्नांच्या पक्षाशी तुमच्या पूर्वजांनी युती केली. असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, वॉशिंग्टनच्या डीसीमध्ये नॅशनल प्रेस क्लबमध्ये राहुल गांधी यांना पत्रकारांकडून केरळच्या मुस्लिम लीगसोबत केलेल्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर राहुल गांधींंनी मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात धर्मनिरपेक्ष असे काही नाही, असं उत्तर दिलं होतं.

Exit mobile version