Download App

मोठी बातमी! वाराणसीमधून नरेंद्र मोदी 6223 मतांनी पिछाडीवर

कॉंग्रेसचे अजय रॉय यांना 11480 मते मिळाली असून ते 6223 मतांना आघाडीवर आहेत. तर मोदींना 5257 मिळाली असून ते 4089 मतांनी पिछाडीवर आहेत.

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत वाराणसीतील सुरूवातीचे कल धक्कादायक आहेत. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पिछाडीवर आहे. येथू्न पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे अजय रॉय 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Madha Loksabha : माढ्यात धैर्यशील मोहितेच, 5 हजार मतांनी घेतली आघाडी…

नरेंद्र मोदी हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या 10 वर्षात देशाचे नेतृत्व करत असताना नरेंद्र मोदींनी वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ म्हणून निवडला होता. त्यामुळे वाराणसी हा अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जातो. दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर मोदी हे पिछाडीवर गेले आहेत. कॉंग्रेसचे अजय रॉय (Ajay Roy) यांना 11480 मते मिळाली असून ते 6223 मतांना आघाडीवर आहेत. तर मोदींना 5257 मिळाली असून ते 6223 मतांनी पिछाडीवर आहेत.

Share Market: निवडणूक निकालांच्या ट्रेंडने शेअर बाजार हादरला, सेन्सेक्स 2300 हून अधिक अंकांनी घसरला 

एक्झिट पोलच्या अगदी उलट खेळ रंग लागला आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे आणि सपा 32 जागांवर आघाडीवर आहे.

65 जागांच्या ट्रेंडमध्ये समाजवादी पक्षाला मोठी आघाडी मिळाली आहे. समाजवादी पक्षाला 32 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपने 25 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. आझाद समाज पक्ष एका जागेवर तर आरएलडी एका पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून 2126 मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी 395 मतांनी पिछाडीवर आहेत. सहारनपूरमधून काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद 10163 मतांनी आघाडीवर आहेत. सीतापूरमधून काँग्रेसचे राकेश राठोड 4331 मतांनी पुढे आहेत. बाराबंकीमधून काँग्रेसचे तनुज पुनिया 1097 मतांनी आघाडीवर आहेत.

 

follow us

वेब स्टोरीज