Download App

नथुराम गोडसेच्या देशभक्तीवर शंका घेणार नाही… : भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं विधान

Trivendra Singh Rawat on Nathuram Godase : काही महिन्यांपूर्वी कालीचरण महाराज यांनी नथुराम गोडसेचं (Nathuram Godse) उदात्तीकरण करून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींविषयी (Mahatma Gandhi) वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. त्यानंतर आता उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेविषयी मोठं विधान केलं. नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असं ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. (Nathuram Godse was a patriot; Statement of Trivendra Singh Rawat)

Vijay Mali Sucess Story | अवकाळी पावसातही वांग्यानं शेतकऱ्यांचं नशीब बदललं! | LetsUpp Marathi

काल नथुराम गोडसे विषयी बोलतांना रावत म्हणाले की, मी नथुराम गोडसेला जितकं ओळखलं, जितकं वाचलं, तो देखील देशभक्त होता. गांधीजींची हत्या हा वेगळा मुद्दा आहे, गांधीजींच्या हत्या मान्य नाही. पण गोडसे देशभक्त होता. त्याच्या देशभक्तीवर शंका घेतली जाऊ शकत नाही.

Shilpa Shetty: ‘अक्षय कुमारने माझा वापर..’, शिल्पा शेट्टीने केला होता गंभीर आरोप 

यावेळी रावत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. रावत यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर  कडाडून टीका केली. राहुल गांधींच्या प्रयत्नांचा काँग्रेस पक्षाला फायदा होणार नाही, लवकरच कॉंग्रेस भूतकाळ जमा होईल. असे ते म्हणाले. राहुल गांधी आपल्या पक्षाची ढासळलेली अवस्था पाहून निराश आणि मानसिक तणावात अशी वक्तव्ये करत आहेत. मानसिक तणावातून जाणार्‍या माणसाला जनता कधीच स्वीकारणार नाही, असं ते म्हणाले.

रावत म्हणाले, राहुल गांधी हे फक्त गांधी आडनावाने गांधीवादी होत नाहीत. ते फक्त बोलतात. राहुल गांधी हे गांधींच्या नावाचा गैरवापर करत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळविण्यासाठी अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावरही रावत यांनी टीका केली. अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा मोठा नाटकी नेता दुसरा कोणी नाही. आता अखिलेश केजरीवाल यांच्याकडून नौटंकी शिकायची आहे, अशी खोचक टीका रावत यांनी केली.

Tags

follow us