Download App

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील ‘तो’ प्रसंग; भाजप नेत्याने म्हटले, केवढा हा अहंकार !

खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल तर केलाच पण एका पत्रकारालाही थेट भाजपाचाच असल्याचे सांगून टाकले. मात्र, ज्या पत्रकाराने राहुल गांधी यांना भाजपशी संबंधित प्रश्न विचारला होता तो पत्रकार भाजपशी संबंधित नसल्याचे आता समोर आले आहे. उलट हा पत्रकार बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसचेच वार्तांकन करत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये मालवीय यांनी म्हटले आहे, की ज्या पत्रकाराने राहुल गांधींना ओबीसी समाजाच्या अपमानाबाबत सरळ प्रश्न केला होता. तो पत्रकार गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे वार्तांकन करत आहे आणि त्यालाच खोडून काढले. तरीही त्याने लाईनच्या बाहेर जाऊन प्रश्न केला तर त्याला सरळ अशा पद्धतीने उत्तर देण्यात आले. केवढा हा अहंकार.. तरीही राहुल गांधी मुक्त प्रेसचे मसिहा आहेत, असे मालवीय यांनी म्हटले आहे.

वाचा : राहुल गांधींनी घेतली पत्रकाराची फिरकी; म्हणाले, देखो हवा निकल गई..

दरम्यान, याआधी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याचवेळी त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. आता जो निकाल आला आहे. त्यानंतर भाजपने असे म्हटले आहे की राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केला आहे. त्यामुळे भाजप आता देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे, असा प्रश्न या पत्रकाराने राहुल गांधींना विचारला.

त्यावर राहुल म्हणाले, तुम्ही इतके थेटपणे भाजपसाठी कशाला काम करताय ? थोडी चर्चा करून विचार करून करा ना. थोडे फिरून मला प्रश्न विचारा असे त्यांनी  म्हटले. तसेच त्यांनी पत्रकाराच्या चेहऱ्यावरील हावभावही सांगितले. ते म्हणाले, बघा आता तुम्ही हसत आहात.

राहुल गांधी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात, भाजपचा हल्लाबोल

माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला जर खरचं भाजपसाठी काम करायचे असेल तर तुम्ही सर्वात आधी तुमच्या छातीवर भारतीय जनता पार्टीचा झेंड लावून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला काय ती उत्तरे देईल. पत्रकार बनण्याचे नाटक आजिबात करू नका. त्यानंतर राहुल गांधी यांनी संबंधित पत्रकाराकडे पाहत हवा निकल गई असे म्हटले. त्यानंतर येथे उपस्थितांत चांगलाच हशा पिकला.

 

Tags

follow us