Arunachal Pradesh Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच ईशान्य भारतातील (Assembly Election Result 2024) राज्यानं भाजपला गुडन्यूज दिली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत. या राज्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घोडदौड करताना दिसत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एसकेएम पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे.
लोकसभा निवडणुकीबरोबर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अरुणाचल प्रदेशात भाजपने पुन्हा क्लीन स्वीप केले आहे. या राज्यांचे निकाल हाती येत असून भारतीय जनता पार्टीने 46 जागांवर विजय मिळवला आहे. एनपीईने एक तर अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली आहे.
महाराष्ट्रात काटे फिरले पण, अरुणाचलात अजितदादांचा जलवा; राष्ट्रवादीच्या शिलेदारांची आघाडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे टोको तातुंग, लिखा सोनी आणि निख कमिन या तीन उमेदवारांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाकडून 15 उमेदवार रिंगणात होते. यातील तीन उमेदवार विजयी झाले आहेत तर दोन उमेदवार मात्र थोडक्यात पराभूत झाले आहेत.
या राज्यात विधानसभेसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. अरुणाचल प्रदेशात 60 आणि सिक्कीममध्ये 32 विधानसभा जागा आहेत. या निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाले आहेत. अरुणाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांती मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होती. भाजप आणि काँग्रेसचेही उमेदवार आहेत. मात्र या दोन्ही पक्षांना येथे विशेष काही करता आले नाही. मतदारांनी पुन्हा सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चालाच कौल दिल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
Exit Poll : मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान, केरळ, तामिळनाडूत खातं उघडणार; ‘इंडिया’चीही टफ फाइट