Download App

केजरीवालांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींची उधळपट्टी; नुसते पडदेच 8 लाखांचे तर, फरश्या…

Arvind Kejriwal House Renovation : मुख्यमंत्री होण्याआधी घर, सुरक्षा आणि कोणतेही सरकारी वाहन घेणार नाही असे म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी किती पैसे खर्च करण्यात आले याची माहिती समोर आली आहे. केजरीवालांच्या बंगल्याच्या नुतनीकरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे.

निवडणुका आल्या की पाणी फुकट, वीज फुकट, शेती कर्जमाफी अशा घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या आम आदमी पक्षाच्या प्रमुखांची म्हणजेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या बंगल्याच्या सजावटीचा खर्च समोर आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर सुमारे 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तर 8 लाख रुपयांचे नुसते पडदेच लावले आहेत. मार्बल बसविण्यासाठी 1 कोटींपेक्षाही जास्त पैसे खर्च केले गेले आहेत. घरात जे गालिचे आहेत त्यांची किंमत तर लाखांच्या घरात आहे.

आता इतका खर्च केला आणि डोळ्यावर येणार नाही असे तर होणार नाहीच. या उधळपट्टीवर भाजपने जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. केजरीवाल यांचा प्रामाणिकपणा आता उघड पडल्याची टीका भाजपने केली आहे. कोरोना संकटाच्या काळात बंगल्याच्या सजावटीसाठी इतके पैसे का खर्च करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केजरीवाल यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा

केजरीवाल यांच्या बंगल्यातील एका पडद्याची किंमत 8 लाख रुपयांच्या जवळपास आहे. असे 23 पडदे मागवले आहेत. 1 कोटी 15 लाख रुपये किंमतीचे मार्बल व्हिएतनाममधून आयात केले आहेत. 4 कोटी किंमतीचे प्री-फॅब्रिकेटेड लाकूड बसवले आहेत. द इंडियन एक्सप्रेस ने मिळवलेल्या माहितीनुसार, घराच्या कामासाठी पहिली मंजुरी 1 सप्टेंबर 2020 रोजी मिळाली होती. दुसरी मंजुरी मे 2021 मध्ये देण्यात आली.

बांधकाम विभागाकडील माहितीनुसार सिव्हील, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग कामांव्यतिरिक्त विविध वॅटेज आणि आकाराचे स्मार्ट लायटिंग फिक्स्चर (2446), ऊर्जा कार्यक्षम पंखे 80, डंबवेटर लिफ्टही या खर्चाचा भाग आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी वंदे भारत ट्रेनवर खासदाराचे पोस्टर चिकटवले, गुन्हा दाखल

दिल्ली कोवडच्या संकटात, केजरीवाल मात्र दुरुस्तीत व्यस्त

हा अहवाल बाहेर आल्यानंतर भाजपने हल्लाबोल सुरू केला आहे. जेव्हा दिल्ली कोविडशी लढत होती, तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या घराच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करत होते, अशी टीका दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर बिधुरी यांनी केली. मुख्यमंत्री होण्याआधी केजरीवाल म्हणाले होते की घर, सुरक्षा आणि कोणतेही सरकारी वाहन घेणार नाही. प्रत्यक्षात मात्र त्यांनी घराच्या दुरुस्तीसाठी 45 कोटी रुपये खर्च केले.

Tags

follow us