Download App

‘उद्यापर्यंत थांबा, सगळेच पुरावे देतो’ ! ‘त्या’ फोन प्रकरणावर भाजप नेत्याचे ममतांना चॅलेंज

Suvendu Adhikari : टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी अखेर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर उत्तर देताना अमित शाह यांना TMC ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी फोन केल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असं आव्हान ममता यांनी दिलं होतं.

यावर आता भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले, की ‘यह डर मुझे अच्छा लगा.’ इतकेच म्हणून ते थांबले नाहीत तर लवकरच मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कसा फोन केला याचे पुरावेही देणार असल्याचे सांगितले.

अमित शाह यांना फोन केल्याचं सिद्ध झाल्यास राजीनामा देईल; अफवांवर ममता बॅनर्जी संतापल्या

अधिकारी पुढे म्हणाले, की ‘दिल्लीला फोन करण्याबाबत बोलायचे तर हा फोन एका लँडलाइन फोनवरुन केला गेला होता. लवकरच या प्रकाराचा पर्दाफाश करणार आहोत. माझ्या अचूक उत्तरासाठी फक्त उद्यापर्यंत वाट पहा. तृणमूलचे सर्वच आमदार भ्रष्टाचाराच्या आरोपांत अटक होत आहेत आणि ममता बॅनर्जी मात्र त्यांचा बचाव करण्याच्या प्रयत्नात आहेत.’

त्यांनी पुढील ट्विटमध्ये म्हटले, की ‘आपण (ममता बॅनर्जी) सारखे पुरुलिया, बांकुरा, बीरभूम, मालदा, मेदिनीपूर या ठिकाणांची नावे का घेत आहात ?, तर तुम्ही येथे 2011 मध्ये सत्ता मिळवली त्यावेळी मी या जिल्ह्यांचा प्रभारी होतो. त्यावेळी तुमचा बिनकामाचा भाचा (अभिषेक बॅनर्जी) तर कुठेच नव्हता. ज्याला 2011 नंतर राजकारणात लाँच केले गेले.’

भाजप 200 जागांचा आकडा पार करू शकणार नाही

भाजपवर टीका करताना ममत बॅनर्जी म्हणाल्या होत्या, की कोणाच्याही मेहरबानीमुळे आम्हाला हे मिळालेले नाही. इतके आमदार-खासदार असतानाही आमचा भाजपला विरोध असल्याने आम्हाला दिले गेले नाही. माझ्या पक्षाचे नाव ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असे आहे आणि असेल. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 200 जागांचा आकडा पार करू शकणार नाही.

Tags

follow us