अमित शाह यांना फोन केल्याचं सिद्ध झाल्यास राजीनामा देईल; अफवांवर ममता बॅनर्जी संतापल्या

  • Written By: Published:
अमित शाह यांना फोन केल्याचं सिद्ध झाल्यास राजीनामा देईल; अफवांवर ममता बॅनर्जी संतापल्या

टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी अखेर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर उत्तर देताना अमित शाह यांना TMC ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी फोन केल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन. असं आव्हान ममता यांनी दिलं आहे.

यावर पुढे ममता बॅनर्जी म्हणाल्या की , तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर अमित शाहांना चार वेळा फोन केल्याचे बोलले जात आहे. हे खोटे पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू. जे लोक असे बोलतात, आम्ही त्यांच्याकडून या खोटेपणाबद्दल माफी मागायला सांगू. आमच्या चार आमदारांना अटक करण्यात आली आहे.” अशी टीका देखील त्यांनी केली.

Atiq Ahmed : अतिक अहमदच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात उमटले…

भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्रीय एजन्सीपासून सर्वजण माझ्याविरोधात कट रचत आहेत. खोटे आख्यान तयार करण्याचं त्यांचे काम आहे. ते सरकारच्या पैशावर निवडणूक लढवतात. देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष भाजप आहे. आम्हाला न्यायालयाचा पूर्ण आदर आहे. आम्ही जनतेला सांगू इच्छितो की भाजपच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नका. भाजप सांगत सर्वांनी आपसात लढा. पण आम्ही राष्ट्रीय पक्ष होतो, आहोत आणि राहणार.

भाजप 200 जागांचा आकडा पार करू शकणार नाही

त्यावर पुढे भाजपवर टिका करताना त्या म्हणाल्या की कोणाच्याही मेहरबानीमुळे आम्हाला हे मिळालेले नाही. इतके आमदार-खासदार असतानाही आमचा भाजपला विरोध असल्याने आम्हाला दिले गेले नाही. माझ्या पक्षाचे नाव ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असे आहे आणि असेल. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 200 जागांचा आकडा पार करू शकणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube