राहुल गांधींना दिलासा! खासदारकी होणार बहाल?, सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?

मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याच्या दोन वर्षांच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली जाईल, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. सीमा हैदरला आरपीआय तिकीट देणार पण कोणते ? आठवलेंनी स्पष्टचं सांगितले राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती ही केवळ काँग्रेससाठीच नव्हे, तर विरोधी आघाडी […]

Rahul Gandhi News

Rahul Gandhi News

मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याच्या दोन वर्षांच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली जाईल, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले.

सीमा हैदरला आरपीआय तिकीट देणार पण कोणते ? आठवलेंनी स्पष्टचं सांगितले

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती ही केवळ काँग्रेससाठीच नव्हे, तर विरोधी आघाडी I.N.D.I.A.साठीही दिलासा देणारी बातमी आहे. राहुल गांधींना लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल यांची संसद पूर्ववत होऊ शकते. यासोबतच ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही सहभागी होऊ शकतात.

निवडणुकांसाठी आम्ही सुद्धा तयारच पण…; लांबलेल्या निवडणुकांवर फडणवीस स्पष्टच बोलले

सर्वोच्च न्यायालय म्हटलं :
राहुल गांधींना जास्तीत जास्त शिक्षा का देण्यात आली? न्यायालयाने राहुल गांधी यांना 1 वर्ष 11 महिन्यांची शिक्षा सुनावली असती तर संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले नसते. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झाल्यानंतर त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राहुल यांची खासदारकी बहाल होणार आहे. यासोबतच राहुल पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक लढवू शकणार असल्याचेही न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राहुल गांधींना दिलासा मिळाल्याने काँग्रेस नेते खूश आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, हा आनंदाचा दिवस आहे. आज मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्याशी बोलणार आहे.

Exit mobile version