सीमा हैदरला आरपीआय तिकीट देणार पण कोणते ? आठवलेंनी स्पष्टचं सांगितले

सीमा हैदरला आरपीआय तिकीट देणार पण कोणते ? आठवलेंनी स्पष्टचं सांगितले

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या(Seema Haider) राजकारणातील प्रवेशाची चर्चा सध्या रंग उधळत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athavle) यांनी सीमाच्या पक्षप्रवेशाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकारणात एकच चर्चा रंगू लागली आहे. ‘सीमा हैदरचा पक्षाशी काही संबंध नाही, पण तिला आम्ही पाकिस्तानात जाण्याचं तिकीट देऊ’ असं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.

आठवले पुढे बोलताना म्हणाले, आमच्या पक्षाचा आणि सीमा हैदरचा काहीही संबंध नाही. ती पाकिस्तानातून भारतात दाखल झाली आहे. त्यामुळं तिला आमच्या पक्षात प्रवेश देण्याचा प्रश्नच येत नाही. जर आम्हाला तिला कुठलं तिकीट द्यायचंच असेल तर भारतातून पाकिस्तानात जाण्याचं तिकीट तिला देऊ, असं आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आरपीआयचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमा हैदरला आपल्या पक्षात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी सीमाची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली होती. ‘इटलीहून आलेल्या सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा झुल्फिकार बडोदावाला 11 ऑगस्टपर्यंत ATS कोठडीत

सीमाला भारतीय सिनेमांमध्ये काम करण्याची ऑफर असल्याची बातमी समोर आल्यानंतर आता भारतीय राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सीमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (RPI) ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.

India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी

यावर बोलताना आरपीआयचे हेमंत रणपिसे म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किशोर मासूम यांनी सीमा हैदरला आठवले साहेब पक्षात घेतील का? असा प्रश्न विचारला होता. असता आठवले साहेबांच्या पक्षात सर्व जाती धर्मातील नागरिकांना प्रवेश करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. परंतु, सध्या सीमा हैदर यांची भारतात चुकीच्या पद्धतीने प्रवेश केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

भविष्यात जर, सीमाला भारत सरकारने या सर्व प्रकरणात निर्दोष जाहीर केले. तसेच तिला भारतीय नागरिक म्हणून स्वीकरले तर, सीमाच्या पक्ष प्रवेशाबाबत विचार केला जाऊ शकतो असे स्पष्ट केले होते. मात्र, तोपर्यंत आम्हाला किंवा आमच्या पक्षाला कोणत्याही वादात पडायचे नसल्याचेही हेमंत रणपिसे यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube