अखेर काँग्रेसचं ठरलं ! Rahul Gandhi सूरतला जाणार; ‘त्या’ निर्णयाला देणार आव्हान

Rahul Gandhi : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर सूरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला ते आता न्यायालयात आव्हान देणार आहेत. यासाठी राहुल गांधी सोमवारी सूरत सत्र न्यायालयात निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कर्नाटक येथे 2019 साली एका सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत एक […]

Rahul Gandhi

Rahul Gandhi

Rahul Gandhi : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर सूरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला ते आता न्यायालयात आव्हान देणार आहेत. यासाठी राहुल गांधी सोमवारी सूरत सत्र न्यायालयात निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

कर्नाटक येथे 2019 साली एका सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी दाखल याचिकेत सुनावणी सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या शिक्षेसह 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयानेही त्यांची खासदारकी रद्द केली होती.

मोदीच तारणहार ! कर्नाटक राखण्यासाठी करणार तुफान प्रचार; ‘हा’ आहे भाजपचा प्लॅन

सूरत न्यायालयाच्या निकालाला राहुल गांधी आव्हान देणार अशी चर्चा आहे. राहुल गांधी हे अखेर त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करणार आहेत. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास त्यांच्यावर केली गेलेली अपात्रतेची कारवाईही रद्द होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी आता न्यायालय काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर भाजप – महाआघाडीची शक्ती पणाला…

नेमके प्रकरण काय ?

ही घटना सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीची आहे. कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी यांनी ‘कैसे सभी चोरों का सरनेम मोदी है?’ असे म्हटले होते, असा आरोप आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपा आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींच्या या टिप्पणीने संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आपल्या तक्रारीत केला होता.

दरम्यान, न्यायालयाने यासाठी राहुल गांधी यांना एक महिन्याची मुदत दिली होती. तरी देखील काँग्रेसकडून कोणत्याच हालचाली केल्या जात नव्हत्या. राहुल गांधींच्या लिगल टीमने या निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यास उशीर केल्यावरून भाजपकडून टीका केली जात होती. काँग्रेस आगामी कर्नाटक निवडणुकीत याचा राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात असल्याचेही भाजपकडून म्हटले जात होते.

सर्वसामान्यांना मोठा झटका; वीज दरात मोठी वाढ

यावर काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी उत्तर दिले होते. यावर लिगल टीम काम करत आहे. केव्हा आणि कुठे अपील दाखल करायचे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. आमच्याकडे तीस दिवसांचा वेळही आहे, असे त्यांनी म्हटले होते.

Exit mobile version