Download App

सरकारी टोमॅटो आणखी स्वस्त! एका किलोसाठी द्या फक्त ‘इतके’ पैसे

Tomato Price Hike : टोमॅटोच्या वाढत्या किंमतीनी (Toamto Price Hike) देशभरात हाहाकार उडालेला असतानाच आता सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटोच्या वाढत्या किंमती नियंत्रित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून टोमॅटो सरकारी किंमतीवर 80 रुपये प्रति किलो या दराने विक्री करावेत, असे आदेश दिले आहेत. याआधी मंत्रालयाने एक किलो टोमॅटोची विक्री किंमत 90 रुपये निश्चित केली होती.

टोमॅटोमुळं पत्नीनं सोडलं घर अन् पतीनं घेतली अनोखी शपथ

टोमॅटोच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली एनसीआरसह देशातील अन्य राज्यांतील नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतून टोमॅटो खरेदी करून एनसीसीएफ ग्राहकांना 90 रुपये प्रति किल दराने टोमॅटो विक्री करत होती. आता या किंमतीत आणखी दहा रुपये कपात करण्यात आली आहे. देशभरात अशी 500 ठिकाणे आहेत जेथे सरकार स्वतः टोमॅटो विक्री करत आहे.

नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्ज्यूमर फेडरेशन ऑफ इंडिया (एनसीसीएफ) संस्थेने सरकारे दिलेल्या सूचनांनुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदी केली आहे. यानंतर ओखला आणि नेहरू प्लेस यांसारख्या ठिकाणी रिटेल आउटलेट्स स्थापित केले आहेत. याव्यतिरिक्त दिल्ली-एनसीआर क्षेत्रात 20 पेक्षा जास्त मोबाइल व्हॅनही या कामासाठी तैनात केल्या आहेत.

टोमॅटोच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्रानं उचललं पाऊल! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यातून टोमॅटो खरेदी करणार

सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील दीड महिन्यापासून टोमॅटोच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे घरात, हॉटेलात टोमॅटो आता दिसेनासे झाले आहेत. लोकल सर्कल संस्थेच्या सर्व्हेत टोमॅटो खरेदी आणि त्याच्या वापराबाबत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. सर्व्हेत म्हटले आहे, की 46 टक्के कुटुंब एक किलो टोमॅटोसाठी 150 रुपये देत आहेत. तर 14 टक्के कुटुंबांनी टोमॅटो खाणेच बंद केले आहे. 68 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर कमी केला आहे.

राजधानी दिल्ली शहरात 24 जून रोजी टोमॅटोच्या किंमती 20 ते 30 रुपये किलोवरून थेट 180 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या. चांगल्या दर्जाचे टोमॅटो तर 220 रुपये किलो दराने विकले जात होते. तामिळनाडू, केरळ राज्यांत टोमॅटोच्या किंमती 180 रुपयांपर्यंत पोहोचल्या.

 

Tags

follow us