दिल्लीतील पेंट फॅक्टरीला भीषण आग; 11 कामगारांचा होरपळून मृत्यू, 4 जखमी

Alipur Fire Accident : राजधानी दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची (Alipur Fire Accident) घटना घडली आहे. या आगीत तब्बल 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दिल्ली शहरातील (Delhi) अलीपूर भागात असणाऱ्या दयाल मार्केटमधील एका पेंट दुकानाला ही आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आलेले […]

दिल्लीतील पेंट फॅक्टरीला भीषण आग; 11 कामगारांचा होरपळून मृत्यू, 4 जखमी

दिल्लीतील पेंट फॅक्टरीला भीषण आग; 11 कामगारांचा होरपळून मृत्यू, 4 जखमी

Alipur Fire Accident : राजधानी दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची (Alipur Fire Accident) घटना घडली आहे. या आगीत तब्बल 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दिल्ली शहरातील (Delhi) अलीपूर भागात असणाऱ्या दयाल मार्केटमधील एका पेंट दुकानाला ही आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आलेले नाही. गुरुवारी सायंकाळी आग लागली त्यावेळेस कामगार काम करत होते. त्यांना काही कळण्याच्या आत आगीने रुद्र रुप धारण केले. कुणालाही बाहेर पडता आले नाही. त्यामुळे कामगारांची होरपळून मृत्यू झाला असावा असे सांगण्यात येत आहे.

Delhi AQI : इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही प्रदूषण आरोग्यास हानिकारक; जाणून घ्या प्रतिबंधक उपाय

आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. ही एक मजली इमारत होती. येथे पेंट तयार केला जात होता. या घटनेत आतापर्यंत अकरा कामगारांचा मृत्यू झाला आहे. चार कामगार जखमी झाले आहेत. मदतकार्य अजूनही सुरुच आहे अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक वाहनांसह येथे दाखल झाले. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी 22 गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आतील कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच जखमी झालेल्या कामगारांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग लागण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दिल्ली पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच आग नेमकी कशामुळे लागली होती याचे कारण समोर येईल.

Chile Wild Fire : चिलीच्या जंगलात भीषण आग! 46 लोकांचा मृत्यू, हजारो हेक्टर जंगल खाक

Exit mobile version