Chile Wild Fire : चिलीच्या जंगलात भीषण आग! 46 लोकांचा मृत्यू, हजारो हेक्टर जंगल खाक

Chile Wild Fire : चिलीच्या जंगलात भीषण आग! 46 लोकांचा मृत्यू, हजारो हेक्टर जंगल खाक

Chile Wild Fire News : दक्षिण अमेरिकेतील चिली देशात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा (Chile Wild Fire) करण्यात आली आहे. चिलीच्या जंगलात भीषण आग भडकली आहे. या आगीत आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आगीत हजारो हेक्टरवरील जंगल नष्ट (Forest Fire) झाले आहे. या आगीमुळे चिलीतील विना डेल आणि वालपराइसो येथे राहणाऱ्या लोकांनी त्यांची घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे भाग पडले आहे. चिलीचे राष्ट्रपती गॅब्रिएल बोरिक यांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली. जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. मदतकार्य सुरू करण्यात आले आहेत. आगीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. मयतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता चिलीच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील हवाईच्या जंगलात अग्नितांडव! मृतांचा आकडा 89 वर, शोध मोहिम सुरू

याव्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे मात्र याबाबत खात्री झालेली नाही असे गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितले. सध्या देशभरात 92 आगीच्या घटनांची सूचना मिळाली असून यामध्ये 43 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सध्या दक्षिण अमेरिकेच्या (South America) काही भागांत वणव्यात वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) उष्णता वाढ आणि आगीसारख्या घटनांचा धोका वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

चिलीच्या जंगलात आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. आता येथील तापमान 40 अंशांवर पोहोचले आहे. या आगीमुळे किनाऱ्यालगतच्या शहरांमध्ये धूर पसरला आहे त्यामुळे लोकांची घुसमट होत असून त्यांना घरे सोडून जाणे भाग पडत आहे.

Houthi Attack : ‘हूथी’ बंडखोरांवर पुन्हा ‘एअर स्ट्राईक’ अमेरिका-ब्रिटेनच्या हल्ल्यांत 8 अड्डे उद्धवस्त

follow us
  • fb
  • instagram
  • youtube