अमेरिकेतील हवाईच्या जंगलात अग्नितांडव! मृतांचा आकडा 89 वर, शोध मोहिम सुरू
Hawaii wildfire : अमेरिकेमधील हवाई येथील माऊईच्या जंगलात लागलेल्या आगीत (Maui Forest) आतापर्यंत एकूण 89 जणांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत ही संख्या 67 इतकी होती. यात आता वाढ झाली. तसेच मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. सुमारे 2100 एकरांवरील झाडे आणि 2200 हून अधिक घरे आणि गाड्या यात जळाल्या आहेत. गेल्या 100 वर्षांतील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्या, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्रिशमन दिलाचे जवान सातत्याने प्रयत्न करत आहेत. (89 dead 2100 acres of trees burned in forest fire in Hawaii)
हवाईमध्ये काही दिवसांपासून जंगलाला आग लागली आहे. आगीने संपूर्ण जंगलाला वेढले असून चक्रीवादळामुळे ही आग सर्वत्र पसरत आहे. लाहैना शहरातील ऐतिहासिक वास्तूंचेही या आगीत नुकसान झाले आहे. घरे आगीत जळून खाक झाली असून लोकांची जीव वाचवण्यासाठी लोक धडपड सुरू आहे. लोकांना नद्या आणि समुद्रात उड्या माराव्या लागत आहे.
या भीषण आगीवर अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र आग आणि धुरामुळे त्यात अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवणे कठीण होत आहे. यामध्ये आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती राज्यपाल जोश ग्रीन यांनी व्यक्त केली आहे.
राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
गव्हर्नर जोश ग्रीन म्हणाले, “आग आटोक्यात आणल्यानंतर आमची पहिली प्राथमिकता लोकांना त्यांच्या घरी परत आणणे आणि चांगली आरोग्य सेवा देणे आहे.” आगीमुळे या भागातील जनजीवनही विस्कळीत झाले असून ते पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेकडो लोक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे ग्रीन यांनी सांगितले.
यूएस वेदर सर्व्हिसच्या मते, चक्रीवादळ डोरा देखील हवाईमधील या जंगलातील वणव्याच्या जलद उद्रेकास कारणीभूत आहे, ज्याच्या जोरदार वाऱ्यामुळे आग खूप वेगाने पसरली. दरम्यान, ही हवाईची 100 वर्षांतील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती आहे. यापूर्वी 1960 च्या सुनामीत 61 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 2018 मध्ये कॅलिफोर्नियाच्या पॅराडाईज शहरात आगीमुळे 85 लोकांचा मृत्यू झाला होता. हा आकडाही आता मागे पडला आहे.