Download App

दिल्लीवाले सगळ्यात विसराळू ! कारमध्ये खुशाल विसरून जातात ‘या’ वस्तू; वाचा..

Uber Lost-Found Index : आपल्याला रोज काही ना काहीतरी विसरण्याची सवय असते. कधी घराची चावी विसरते, तर कधी पैशांची पाकिट. प्रवासात असताना अचानक लक्षात येते की अरे ऑफिसची चावी तर घरीच राहिली. मग काय, किती पंचाईत होते ज्याला त्यालाच माहित.

लोक काय विसरतात, कोणत्या शहरातील लोक जास्त विसरभोळे आहेत याचाही अहवाल आला आहे. मोठ्या शहरांतील लोक टॅक्सीतून प्रवास करताना नेमके काय काय विसरतात हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

उबर संस्थेने नुकताच लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स 2023 हा अहवाल जारी केला आहे. हा अहवाल सर्वात जास्त कोणत्या वस्तू विसरल्या जातात, कोणत्या शहरातील सर्वाधिक विसराळू आहेत याची माहिती देतो.

कर्नाटकमध्ये झाडांवरुन पैशांचा पाऊस; नेमकं प्रकरण काय?

विसराळूपणाच्या बाबतीत देशाची राजधानी दिल्ली शहर टॉपवर आहे. दिल्लीआधी मुंबई हे शहर आघाडीवर होते. कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. चार सर्वाधिक विसराळू शहरांच्या यादीत हैदराबाद शहराचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.

उबर राइड वेळी प्रवासी आपले फोन, बॅग, पैशांचे पाकिट कॅबमध्येच विसरून गेले. या व्यतिरिक्त पाण्याची बाटली, चावी, अॅक्सेसरीज, चष्मा, ज्वेलरी वस्तूही लोक मोठ्या प्रमाणात कॅबमध्येच विसरल्याचे दिसून आले. भारतीयांचा विचार केला तर अगदी झाडू, कॉलेजचे प्रवेश पत्र विसरले असल्याचे दिसले. एक महाशय तर त्याचा टीव्हीच उबर कॅबमध्ये विसरून गेला होता.

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या किंमती 6 टक्क्यांनी घटणार…

या अहवालाबाबत माहिती देताना सेंट्रल ऑपरेशन्सचे निदेशक नितीश भूषण यांनी सांगितले की प्रवाशांच्या काही वस्तू कारमध्येच विसरून राहिल्या असतील तर त्या वस्तू त्यांना पुन्हा देण्याचा पर्याय आम्ही त्यांना दिला आहे.

Tags

follow us