Arvinder Singh Lovely Resignation : देशात लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्रित निवडणुका लढत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने आपला मोठा धक्का बसला आहे. तर आता दुसरा धक्का काँग्रेसला बसला आहे. पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी (Arvinder Singh Lovely) राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दिल्लीत काँग्रेसने (Congress Party) आम आदमी पार्टीबरोबर आघाडी केल्याने ते नाराज होते, अशी चर्चा आहे.
Congress Manifesto : महिलांना वार्षिक 1 लाख, 30 लाख नोकऱ्या; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
जो पक्ष काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावण्याच्या आधाारावरच अस्तित्वात आला होता त्याच पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतला. ऑगस्ट 2023 मध्ये ज्यावेळी माझ्याकडे कार्यभार दिला गेला त्यावेळी दिल्लीत काँग्रेसची काय स्थिती होती हे सगळ्यांना माहिती आहे. यानंतर विविध उपाय करून पक्षाला ऊर्जा देण्याचं काम केलं. अनेक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षात समावेश केला. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम केलं, असे लवली यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये फेब्रुवारीमध्येच दिल्लीतील जागावाटप झालं होतं. काँग्रेस तीन तर आप चार जागांवर लढत आहे. आम आदमी पार्टीच्या खात्यात नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि पूर्व दिल्ली तर काँग्रेसला चांदणी चौक, उत्तर पूर्व दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली हे मतदारसंघ मिळाले आहेत. मागील 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने या सातही जागा जिंकल्या होत्या.
यावर आता भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील व्हिजन देणारा पक्ष आणि आघाडी आहे. तर दुसरीकडे अशी आघाडी आहे ज्यांच्यात विभाजन आणि गोंधळाची स्थिती आहे. आज अरविंदर सिंह लवली यांच्या राजीनाम्याने स्थिती स्पष्ट झाली आहे. ज्या आम आदमी पक्षाचा जन्मच काँग्रेस संपवण्यासाठी झाला. त्या पक्षाशी आघाडी केल्याने कार्यकर्ते निराश झाल्याचे पूनावाला म्हणाले.
Congress : PM मोदींचं कौतुक अन् काँग्रेस विरोधात वक्तव्य; मोठ्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी