Download App

घर सांभाळणाऱ्या महिलाही कमी नाहीत; देशाच्या GDP मध्ये देतात ‘इतक्या’ कोटींचे योगदान, वाचा..

GDP : घरात राहून स्वयंपाक करण्यापासून ते मुलांची काळजी घेण्यापर्यंत गृहिणींचा अर्थव्यवस्थेला हातभार लागत नाही, असे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. या घरगुती महिलांचाही जीडीपीमध्ये (GDP) वाटा आहे. त्यांचे योगदान कमी नाही. ते वार्षिक 22.7 लाख कोटी रुपये आहे, जे देशाच्या जीडीपीच्या 7.5 टक्के आहे. म्हणजेच, देशातील महिलाही जीडीपीत मोठे योगदान देत असल्याचे याद्वारे सिद्ध होत आहे.

SBI Ecowrap चा नवीनतम अहवाल काय सांगतो?

SBI Ecowrap च्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मोठी गोष्ट म्हणजे या योगदानात ग्रामीण महिलांचा वाटा अधिक आहे. ECOWRAP अहवाल तयार करण्यासाठी SBI ने सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) डेटा आधार म्हणून घेतला आहे. आकडेवारीनुसार पगार नसलेल्या गृहिणी दिवसाचे 7.2 तास घरी काम करतात. यामध्ये घरातील विविध कामांसह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे समाविष्ट आहे.

वाचा : GDP म्हणजे नक्की काय ?, कसा मोजला जातो ? ; जाणून घ्या, माहिती महत्वाची 

अहवाल तयार करण्यासाठी 18 ते 60 वयोगटातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे. अहवालात शहरी भागात 18-60 वयोगटातील महिलांची संख्या 13.2 कोटी आणि ग्रामीण भागात 28.7 कोटी आहे. शहरी भागात 13.2 कोटींपैकी 4 कोटी महिला मजुरीवर काम करतात. त्याच वेळी, ग्रामीण भागातील 28.7 कोटी महिलांपैकी केवळ 1.4 कोटी महिला पगारदार आहेत.

शहरी महिलांना दरमहा आठ हजार रुपये पगार

Ecowrap अहवालात ग्रामीण महिलांसाठी दरमहा 5,000 रुपये आणि शहरी महिलांना दिवसाचे आठ तास काम करण्यासाठी 8,000 रुपये प्रति महिना वेतन गृहीत धरले आहे. त्यानुसार ग्रामीण भागात बिनपगारी काम करणाऱ्या महिला जीडीपीमध्ये 14.7 लाख कोटी रुपयांचे योगदान देत आहेत, तर शहरी भागातील घरगुती महिला आठ लाख कोटी रुपयांचे योगदान देत आहेत.

Nana Patole : शेतकऱ्याची बत्ती गुल केली तर आम्ही सरकारची करु

श्रमिक बाजारपेठेत महिलांचे योगदान

SBI समुहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांच्या मते, बिनपगारी घरगुती काम हा अर्थपूर्ण उत्पादक क्रियाकलापांचा एक महत्त्वाचा भाग आहे जो कुटुंबांना आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावतो. परंतु ही घरातील कामे आर्थिक क्रियाकलापांपासून तसेच आर्थिक धोरणांपासून दूर ठेवली जातात. श्रमिक बाजारपेठेतील महिलांचे योगदान समजून घेण्यासाठी त्यांच्या बिनपगारी कामाचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे ज्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे घर सांभाळत असल्या म्हणून महिला देशाच्या अर्थव्यवस्थेत, देशाच्या आर्थिक व्यवस्थेत काहीच योगदान देत नाहीत असे म्हणणे बरोबर नाही. या अहवालाने तसे सिद्धच करून दाखवले आहे.

 

Tags

follow us