Karnataka Politics : कर्नाटक राज्य काँग्रेसने (Karnataka Politics) हिसकावून घेतल्यानंतर भाजपाने (BJP) दक्षिणेतील राज्यातील रणनिती बदलली आहे. सध्या राज्यात काँग्रेसने सत्तेत येण्याआधी जनतेला जी आश्वासने दिली होती ती पाळली नाहीत म्हणून भाजप आक्रमक झाला आहे. त्यानंतर आता भाजपाने या विरोधाला अधिक धार देण्यासाठी तसेच आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार करून ताकदवान नेते राज्याच्या राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक प्रदेश भाजपाच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे तर विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची नियुक्ती करण्याचे जवळपास निश्चित केले आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
या दोन्ही पदांबाबत भाजपाच्या आमदारांची काय मते आहेत हे केंद्रीय निरीक्षक मनसुख मांडविया आणि विनोद तावडे यांनी जाणून घेतले. त्यानंतर हा अहवाल वरिष्ठ नेत्यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे पक्षाने शोभा करंदलाजे यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्याचे नक्की केले आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपदी बसनगौडा पाटील यांची नियुक्ती निश्चित असल्याचे मानले जात आहे.
देशभरात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळेस भाजपाने दक्षिणेतील राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. वेगळा प्लॅन तयार केला आहे. उत्तरेतील हिंदी पट्ट्यातील राज्यांतील जागांचे नुकसान दक्षिणेतून भरून काढण्याचा भाजप नेत्यांचा विचार आहे. त्यामुळे भाजप नेते दक्षिणेतील राज्यांकडे विशेष लक्ष देत आहेत.
राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?