उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

Thackeray Group vs Shinde Group : राष्ट्रवादीत अजित पवारांमुळे घडलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही बसू लागले आहेत. राष्ट्र्रवादीनंतर आता उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फुटीने आधीच जर्जर झालेल्या शिवसेनेसाठी (उबाठा) परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. विधानपरिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह ठाकरे गटाचे दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत (शिंदे गट) जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या विधानपरिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे या आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटात सारेच काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं? निवडणूक आयोगाने संकेत दिले..

सध्या राष्ट्रवादीला गळती लागली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांतही चलबिचल वाढली आहे. निवडणुका जवळ येत असताना या घडामोडी घडत असल्याने पदाधिकारी, नेत्यांत चांगलाच गोंधळ उडाला आहे.

या राजकारणात आपले राजकीय भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी जो तो प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळेच पक्षांतराचे प्रकार वाढीस लागले आहेत. कालच उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी शिंदे गटातील नाराज आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र, एक दिवस उलटत नाही तोच ठाकरे गटालाच धक्का बसणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. ठाकरे गटाचा विधानपरिषदेतील उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

NCP Political Crisis : …म्हणून शरद पवारांचा धुळे-जळगाव जिल्हा दौरा झाला रद्द

ठाकरे गटाच्या प्रमुख महिला नेत्या 

गोऱ्हे या उद्धव ठाकरे गटाच्या एकनिष्ठ म्हणून ओळखल्या जात होत्या. पक्षातील प्रमुख महिला नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसेच त्याआधी भाजपबरोबर युती तुटल्यानंतरच्या काळात त्यांनी ठाकरे गटाची बाजू समर्थपणे सांभाळली होती. विधानपरिषदेतील उपसभापती म्हणूनही त्यांचे काम चांगले चालले होते. असे असतानाही त्या आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांत वादाची स्थिती निर्माण झाली होती. विधानपरिषदेत गोऱ्हे या उपसभापती असूनही बोलू देत नाहीत अशी तक्रार ठाकरे गटातील आमदारांची होती.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube