राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं? निवडणूक आयोगाने संकेत दिले..

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं? निवडणूक आयोगाने संकेत दिले..

मागील एक वर्षांच्या कालावधीत घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात निवडणुका होणार असल्याचं दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून येत्या सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असल्याचे संकेतच दिलेत. विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार असल्याचं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

अजिदादांना सोडून शरद पवारांसोबत का? लहामटेंनी सांगितली कारणं

राज्यातल्या एकूण 23 महानगरपालिकांची मुदत संपलीय. या महानगरपालिकांच्या निवडणुका अद्यापही रखडलेल्याच आहेत. यासोबतच 25 जिल्हा परिषद आणि 207 नगरपालिकांच्याही निवडणुका प्रलंबित आहेत. एकंदरीत शहरी भाग वगळता ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात.

‘मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष, माझ्याकडे किती आमदार लवकरच कळेल’; पवारांनी ठणकावलं!

जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकाही महत्वाच्या समजल्या जातात. राज्यातल्या एकूण 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे.

काय म्हटलं राजपत्रात?
विधानसभेच्या मतदार याद्या सष्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 कालावधीत होणाऱ्या महानगरपालिक, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचं अधिसूचित करण्यात येत आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे. ५ जुलै २०२३ रोजी काढलेले हे परिपत्रक आहे.

NCP : साहेबांनी आम्हाला एकत्र बसवून पॅचअप करावं, आमदार दिलीप बनकरांची साद…

निवडणूक आयोगाच्या या प्रसिद्धीपत्रकानंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच बिगुल वाजलं असल्याचं दिसून येत आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube